गाजियाबाद, 18 ऑक्टोबर : गाजियाबादमध्ये ( Ghaziabad News) बाल्कनीमध्ये रात्री एकत्रित बसलेल्या दोन जुळ्या भावांचा 25 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू (Two twin brothers die after falling from the 25th floor) झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री सिद्धार्थ विहारमधील प्रतीक ग्रँडमध्ये घडली. या अपघाताची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. सीओ फर्स्ट महिपाल सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही मुलांची नावं सूर्य आणि सत्य आहे. ते नववीच्या वर्गात शिकत होते. घटनेबाबत अनेक गोष्टी समोर येत असून सर्व बाजूने तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणाचीही तक्रार आलेली नाही. बाल्कनीमध्ये एक चेअर उलटी पडलेली होती. सोसायटीचा सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासलं जात आहे. (Birth and death together The unfortunate end of two twin brothers falling from the 25th floor)
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईला राहणारे पलानी मुदलिया आपल्या कुटुंबासह प्रतीक ग्रँड सोसायटीच्या 25 व्या माळ्यावर राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलीसह दोन जुळी मुलंही होती. पलानी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला (Father went to Mumbai) गेले होते. शनिवारी रात्री त्याचं कुटुंब घरातच होतं. रात्री साधारण 10 वाजता टिव्ही पाहिल्यानंतर पत्नी राधा झोपली. साधारण 12 वाजता डोळे उघडले तर त्यांनी पाहिलं की, दोन्ही मुलं बाल्कनीट बसले होते. त्यांनी दोघांना आत झोपण्यात सांगितलं. मुलांनी काही वेळात येतो असं सांगितलं आणि आईकडे पाणी मागितलं. राधाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं म्हणाले की, आज चंद्र दिसत नाही. चंद्र पाहून येतो. थोळ्या वेळानंतर राधा पुन्हा त्यांना पाहण्यासाठी गेली तेव्हा या अपघाताबद्दल कळलं. ती तातडीने दोन्ही मुलांना घेऊन रुग्णालयात गेली. आणि पतीला याबाबत माहिती दिली. रुग्णालयातच मुलांना मृत घोषित करण्यात आलं.
बाल्कनीत खुर्चीवर छोटा पाट ठेवल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा-VIDEO: क्लास बुडवला म्हणून भयंकर शिक्षा; विद्यार्थ्याला केस पकडून अमानुष मारहाण
मोबाइल हिस्ट्रीमध्ये गेमचा संदर्भ नाही..
बाल्कनीमध्ये जे दिसलं, त्यात मुलांनी एका मोबाइल गेम खेळण्याबद्दल बोलत होते. या प्रकरणात प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही. विजयनगर पोलीस ठाण्याच्या प्रभाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही मुलांचे मोबाइल फोन पाहण्यात आले. त्यांच्या मोबाइल हिस्ट्रीमध्ये गेम प्ले असल्याचं दिसत नाही. अन्य तपासही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्य सत्यापेक्षा एक मिनिटांनी मोठा होता. दोघे नेहमी एकत्र राहत असत. एकच शाळा, एकच वर्ग आणि अभ्यासही एकत्र करीत. सोसायटीतील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भाऊ नेहमी एकत्र दिसत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Shocking news