मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मॅट्रिमोनिअल साईट्समुळे कोट्यवधींचा गंडा; ठाण्यातील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

मॅट्रिमोनिअल साईट्समुळे कोट्यवधींचा गंडा; ठाण्यातील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

लग्नाचे स्वप्न पाहणारे अनेकजण मॅट्रिमोनिअल साईट्स (Matrimonial sites) वर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच फायदा घेत अनेक तोतया आपल्याला फसवू शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 16 डिसेंबर : लग्नाचे स्वप्न पाहणारे अनेकजण मॅट्रिमोनिअल साईट्स (Matrimonial sites) वर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच फायदा घेत अनेक तोतया आपल्याला फसवू शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात एका इसमाने तब्बल 26 महिलांना कोट्यवधींचा गंडा घातला. यानंतर पोलिसांनी आरोपीला केले आहे.

हल्लीच्या धकाधकीच्या काळात अनेकांना लग्नासाठी (Marriage) आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत अनेक मॅट्रिमोनियल साईट्सचा सुळसुळाट झाला आहे. कोणीही या मॅट्रिमोनिअल साइटवर आपले नाव नोंदवून आपल्याला आवडणारी मुलगी किंवा मुलाला पसंत करून लग्न ठरवतात. परंतु याचा गैरफायदा आता अनेकजण घेऊ लागले असून, विधवा आणि घटस्फोटित महिलांना विशेष करून टार्गेट केले जात आहे.

पुदुच्चेरी येथे राहणारा 44 वर्षीय प्रजित जोगीश केजे याने अशाच प्रकारे आपले जाळे पसरवत अनेक राज्यातील तब्बल 26 महिलांना, दोन कोटी 58 लाख रुपयांची फसणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई, केरळ, बंगळुरू, कोलकाता सारख्या अनेक शहरात त्याने मॅट्रिमोनिअल साईट्सवर नावे नोंदविलेल्या 26 महिलांना गंडा घातला.

ठाण्यातील ढोकाळी येथे राहणाऱ्या एका महिलेला देखील त्याने असेच आमिष दाखवत शारीरिक शोषण केले व त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर करून महागड्या वस्तू देखील विकत घेतल्या. आपले पॅरिस येथे हॉटेल होते व त्याच्या विक्रीतून आलेले पैसे RBI मध्ये अडकल्याने ते सोडविण्यासाठी पैसे मागत व त्या बदल्यात दुप्पट व्याज देण्याचे अनेकांना आमिष देत या तोतयाने गंडा घातलाय.

हे ही वाचा-अचानक आलेल्या पतीला पाहून बॉयफ्रेंडला लटकवलं बाल्कनीत, हात सुटून झाला मृत्यू

कापूरबावडी पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल करून, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या शिताफीने तपास करत या ठगाला अटक केली आहे. ठाणे न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याला 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली.

First published:

Tags: Crime news, Cyber crime, Marriage