रिअल लाईफ हिरो: गर्लफ्रेंडसाठी छातीवर झेलली गोळी, स्वत: बाईक चालवत गेला रुग्णालयात

रिअल लाईफ हिरो: गर्लफ्रेंडसाठी छातीवर झेलली गोळी, स्वत: बाईक चालवत गेला रुग्णालयात

गुरुवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींची ओळख पटलेली नसून पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

  • Share this:

बिलासपूर (छत्तीसगड), 30 नोव्हेंबर : कितीही जखमी झाला तरी हिरो त्याच्या प्रेयसीला बचावतो असं आपण सिनेमांत पाहिलं आहे. पण असाच प्रकार रिअल लाईफ झाला आहे. एक युवक जखमी असतानाही तो गुंडांशी दोन हात करतो आणि आपल्या प्रेयसीला सुरक्षित वाचवतो. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी गुंड मारहाणीमध्ये युवकावर गोळी चालवतात. गोळी लागल्यामुळे युवक गंभीर जखमी झाल पण तरीदेखील त्याने स्वत: बाईक चालवली आणि प्रेयसीला घेऊन रुग्णालयात दाखल झाला. सध्या जखमी युवकाला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींची ओळख पटलेली नसून पोलीस सध्या चौकशी करत आहेत. विश्वजीत परीदा असं जखमी युवकाचं नाव आहे. पोलिसांनी विश्वजीतच्या चौकशीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मोठी बातमी - हैदराबाद बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासा, आरोपींनीच केली गाडी पंक्चर आणि...

पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, बिलासपूरमधील सरकंडाच्या अशोक नगर परसरात राहणारा 21 वर्षीय इंजिनिअर विद्यार्थी विश्वजीत परीदा गुरुवारी रात्री गर्लफ्रेंडसोबत बाईकवर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी रस्त्यात एका दुकानातून त्यांनी बिअर पिण्यासाठी घेतली आणि रेल्वे स्थानकाजवळी एका सुनसान जागी गेले. जेव्हा ते परतत होते तेव्हा दोन बाईकस्वार तिथे आले. आरोपींनी युवक-युवतीला धमकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हातात बंदूकही होती.

इतर बातम्या - शरद पवारांची ऐवढी काळजी कोणीच घेतली नसेल, तरुण शेतकऱ्याने केला 200 किमी प्रवास आणि...

भांडणात आरोपींनी चालवली गोळी

आरोपींनी युवतीला सोबत चलण्यासाठी जबरदस्ती केली. त्यावेळी विश्वजीतने गर्लफ्रेंडला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी विश्वजीतवर गोळी झाडली आणि त्याला जखमी केलं. पण तरीदेखील विश्वजीत थांबला नाही. तो बाईकजवळ गेला आणि स्वत: बाईक चालवत गर्लफ्रेंडसोबत रुग्णालयात गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीतच्या छातीवर गोळी लागली आहे. गंभीर अवस्थेमध्ये त्याला अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी विश्वजीत सोबत असलेल्या त्याच्या मैत्रिणीची चौकशी केली असता या प्रकरणात व्ययक्तीक वाद आणि त्रिकोणीय प्रेम प्रसंगामुळे ही भांडणं झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

Published by: Renuka Dhaybar
First published: November 30, 2019, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading