मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /6-7 जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला अडवलं, पत्नीबरोबर गैरवर्तन करत बनवला VIDEO

6-7 जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला अडवलं, पत्नीबरोबर गैरवर्तन करत बनवला VIDEO

Couple Abuse : पोलीस अधीक्षक म्हणाले की, जर दामप्त्यानं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही, तर पोलिसांनी स्वतःच्या जबाबावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Couple Abuse : पोलीस अधीक्षक म्हणाले की, जर दामप्त्यानं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही, तर पोलिसांनी स्वतःच्या जबाबावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Couple Abuse : पोलीस अधीक्षक म्हणाले की, जर दामप्त्यानं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही, तर पोलिसांनी स्वतःच्या जबाबावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

समस्तिपूर (बिहार) 01 जून : बिहारच्या समस्तीपूरमध्ये (Bihar Samastipur) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यात एका तरुण आणि तरुणीबरोबर काहीजण गैरवर्तन करत असल्याचं (Couple Abuse) पाहायला मिळत आहे. हा व्हि़डिओ व्हायरल झाल्यानंतर समस्तीपूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. न्यूज 18 ने पोलिसांना माहिती दिल्यानंतर याबाबत कारवाई सुरू झाली असून, अधीक्षक मानवजीत सिंग ढिल्लो यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

(वाचा-कोरोनामुळं 'ऑपरेशन लोटस' नाही, फडणवीसांचे स्पष्टीकरण, पवार भेटीबाबत म्हणाले..)

हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्या प्रकरणी ढिल्लो यांनी सांगितलं की, पोलिसांनी तयार केलेल्या सायबर सेनानी ग्रुप आणि इतर काही माध्यमातून व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर हा हा व्हिडिओ 15 ते 20 दिवस जुना अशून ज्या तरुण आणि तरुणीबरोबर हा प्रकार झाला ते विवाहित असल्याचंही समोर आलं आहे.

(वाचा-ठाकरे सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर)

या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीमध्ये व्हायरल होणारा व्हिडिओ मोहीउद्दीन नगर परिसरातील असल्याचं समोर आलं. त्यानंतर पीडित दाम्पत्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं. पोलिस अधीक्षक म्हणाले की, जर दामप्त्यानं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही, तर पोलिसांनी स्वतःच्या जबाबावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जर गैरवर्तन करणाऱ्यांची ओळख स्पष्ट झाली तर नावासह तक्रार दाखल करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर गैरवर्तन करणाऱ्यांची ओळख पटली नाही, तर अशा परिस्थितीमध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली जाईल. न्यूज 18 नं हे प्रकरण उचलून धरल्यानंतर या प्रकरणी कारवाईचा वेग वाढला.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime news