Home /News /crime /

क्रूर! साधुने मुलीच्या समोर केली आईची हत्या; कुऱ्हाडीने मारून मारून धडापासून डोकं केलं वेगळं

क्रूर! साधुने मुलीच्या समोर केली आईची हत्या; कुऱ्हाडीने मारून मारून धडापासून डोकं केलं वेगळं

या नराधमाने महिलेच्या लेकीसमोर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली.

    बगहा, 24 : बिहारमधील (Bihar Crime News) पश्चिम चंपारण (Pashchim Champaran) जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या जिल्ह्यातील चौतरवा पोलीस ठाणे हद्दीतील मठिया सरेह या भागात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेकडून तीव्र विरोधामुळे आरोपीने तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. एका साधुवर हत्येचा आरोप आहे.  सांगितलं जात आहे की, साधू हा महिलेच्या शेजारी राहत होता. घटनेनंतर तो फरार झाला आहे. (Bihar : The sadhu tried to rape the woman then killed her) आरोपीचा तपास सुरू... या घटनेबाबत माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूर निवासी तासा देवी गुरुनारी सकाळी आपल्या मुलीसह गवत कापत होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणारा मोतीलाल यादव तेथे पोहोचला आणि महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा महिला आरडा ओरडा करू लागली तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला व फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी साधुच्या वेशात होता. (Bihar Rape and Murder) हे ही वाचा-महिलांचे लचके तोडणाऱ्यांना फाशीच! Rape करून जिवंत जाळणाऱ्याला कोर्टाकडून शिक्षा क्रूरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या मुलीच्यासमोर तिची हत्या करण्यात आली. हा प्रकार अत्यंत भयंकर होता. महिलेचं डोकं तिच्या धडापासून वेगळं होईपर्यंत तिच्या मानेवर वार करीत होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी साधुविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहे. या घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंबिवली भागात एका अल्पवयीन तरुणीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत एक एक जण बलात्कार करीत असल्याचं धक्कादायक वृत्त वाचून देश हादरला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Rape

    पुढील बातम्या