विकृतीचा कळस! कुत्र्यावर बलात्कार; मुक्या जीवालाही हैवाणानं सोडलं नाही

विकृतीचा कळस! कुत्र्यावर बलात्कार; मुक्या जीवालाही हैवाणानं सोडलं नाही

फक्त महिला, तरुणीच नाहीत तर रस्त्यावरील मुके जीवदेखील सुरक्षित नाहीत.

  • Share this:

संजय कुमार/पाटणा, 04 नोव्हेंबर : महिला आणि तरुणी तर सुरक्षित नाहीतच, त्यांच्यावरहील बलात्काराच्या (rape) कित्येक घटना कानावर पडत असतात. मात्र मुक्या जीवांनाही हैवाण सोडत नाहीत. भटक्या कुत्र्यावरही (street dog) एका व्यक्तीनं बलात्कार केला आहे. नराधम कुत्र्यावर बलात्कार करून फरार झाला आहे. बिहारच्या (bihar) पाटण्यातील (patna) ही धक्कादायक घटना आहे.

पाटणात एका सुरक्षा रक्षकानं रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर बलात्कार केला. मुक्या जीवाला आपल्या वासनांधाचं शिकार या नराधमानं बनवलं. कुत्र्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीचा सध्या शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच कुत्र्याला मारहाण करण्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. कुत्र्याला मारहाण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पंजाबच्या (punjab) लुधियानामध्ये (ludhiana) कुत्र्याला मारून मारून (dog beaten) त्याची हत्या करण्यात आली होती. एका सुरक्षारक्षकाने एका भटक्या कुत्र्याला इतकं मारलं की दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. 6 ऑक्टोबरच्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सुरक्षारक्षकाविरोधात प्राणीप्रेमींनी आंदोलन छेडलं. त्याच्याविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली.

हे वाचा - बापरे! बूटामध्ये लपवले 119 प्राणघातक जिवंत कोळी, कारण याहीपेक्षा भयंकर

या घटनेच्या काही दिवसांतच महाराष्ट्रातही असाच प्रकार पाहायला मिळाला. अंबरनाथमध्ये एका व्यक्ती रस्त्यावरील कुत्र्यावर काठीनं सपासप वार करत होती. कुत्र्याच्या तोंडावरही या व्यक्तीनं काठी मारली होती. हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. या व्यक्तीने या कुत्र्याला इतकं मारलं की कुत्र्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या नाकातून रक्त आल्याची माहितीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

काही लोक तर आपल्या मजेसाठी आणि प्रसिद्धीसाठी या मुक्या जीवांचा छळ करतात. ऑगस्टमध्येच एका असा व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एक तरुणी एका कुत्र्याला आधी  दोन पायांवर चालवते त्याचा खेळ करते आणि मग गरागरा फिरवून त्याला रस्त्यावर फेकून देते. हरयाणाच्या चरखी दादरी इथली ही घटना होती.

हे वाचा - आंटी म्हणताच सटकली; भर बाजारातच महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; पाहा VIDEO

याआधीदेखील अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. फक्त कुत्राच नव्हे अशा बऱ्याच मुक्या जीवांच्या जीवाशी खेळ केला जातो. असे बरेच संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाले आहेत.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या