Elec-widget

हायप्रोफाईल डबल मर्डर! रेपचा प्लान फसला म्हणून आमदाराची भाची आणि तिच्या बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल डबल मर्डर! रेपचा प्लान फसला म्हणून आमदाराची भाची आणि तिच्या बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या

केवळ 24 तासांच्या आतच पोलिसांनी हाय प्रोफाईल डबल मर्डर केसचा छडा लावला आहे. हत्या आणि आत्महत्या यामध्ये अडकलेलं हे प्रकरण संध्याकाळपर्यंत दुहेरी हत्याकांड असल्याचं तपासातून निष्पन्न झालं.

  • Share this:

पाटणा, 22 सप्टेंबर : केवळ 24 तासांच्या आतच पोलिसांनी हाय प्रोफाईल डबल मर्डर केसचा छडा लावला आहे. हत्या आणि आत्महत्या यामध्ये अडकलेलं हे प्रकरण संध्याकाळपर्यंत दुहेरी हत्याकांड असल्याचं तपासातून निष्पन्न झालं. बिहारमधल्या मुंगेर येथे घडलेल्या या हायप्रोफाईल डबल मर्डर केसमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपीनं धक्कादायक माहितीची कबुली दिली. कारण सुरुवातीला पोलिसांनी ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. याप्रकरणी आरोपी दानिशला अटक करण्यात आली आहे.

असं आलं सत्य बाहेर

मुंगेरमध्ये घडलेल्या घटनेत रिया आणि तिचा बॉयफ्रेंड आशिफची त्याच्याच मित्रांनी हत्या केली. डीआयजी मनु महाराज यांनी सांगितलं की, रियावर बलात्कार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं आशिफच्याच मित्रांनी हे हायप्रोफाईल दुहेरी हत्याकांड करण्याचा कट रचला. थरकाप उडवणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच डीआयजी मनु महाराज, एसपी गौरव मंगला आणि एसएफएलचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. गोळीबाराच्या पद्धतीवरून हे प्रकरण आत्महत्या ते हत्या या दोन्ही संशयाच्या आजूबाजूनं फिरत होतं. चौकशीदरम्यान मात्र पोलिसी खाक्या पाहताच आरोपी दानिशनं डबल मर्डर केल्याची कबुली दिली.

(वाचा : मित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल)

मित्रांनीच मिळवून दिलं होतं पिस्तुल

Loading...

आरोपी दानिशनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याच्या प्रयत्नांना काहीही यश आलं नाही. डीआयजींनी केलेल्या चौकशीमध्ये त्यानं धक्कादायक माहिती सांगितली. दानिशनं सांगितलं की, आशिफ आणि रियाचं प्रेमप्रकरण होतं. तीन-चार दिवसांपूर्वी आशिफनं तिला पिस्तुलं मिळवून देण्याचं वचन दिलं होतं. रियाला पिस्तुल चालवणं शिकायचं होतं. प्रेयसी नाराज होऊ नये म्हणून आशिफनं रियाचा हट्ट पुरवायचं ठरवलं.

(वाचा : परप्रांतीय विवाहितेचा खून... नवरा बेपत्ता, घराला बाहेरून लावले होते कुलूप)

दानिशची रियावर होती घाणेरडी नजर

घटनेच्या रात्री आशिफसोबत त्याचे आणखी दोन मित्रदेखील हजर होते. दानिशनं सांगितलं की, हत्यार उपलब्ध करून देण्याच्या बहाण्यानं आशिफ आणि त्याची प्रेयसी रियाला बोलावून घेतलं. येथे दानिशनं आपल्या मित्रांसोबत रियावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आशिफनं यास विरोध करून रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस दानिश आणि त्याच्या मित्रांनी मिळून आशिफ आणि रियावर गोळीबार केला. गोळीबारात दोघांचीही मृत्यू झाला. शुक्रवारी (20 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास आशिफ आणि रियाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

(वाचा :आईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा)

रिया आरजेडी आमदाराची होती भाची

या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मृत्युमुखी पडलेली रिया मुंगेरचे आरजेडीचे आमदार विजय कुमार यांची भाची असल्याची माहिती समोर आली आहे. आशिफदेखील मुंगेश शहरातीलच रहिवासी होती. दोघंही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 10:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...