पतीचं जडलं मेहुणीवर प्रेम, पत्नीच्या हत्येचा कट रचण्यासाठी बँकेतून घेतलं कर्ज आणि...

पतीचं जडलं मेहुणीवर प्रेम, पत्नीच्या हत्येचा कट रचण्यासाठी बँकेतून घेतलं कर्ज आणि...

9 जुलै रोजी गर्भवती रुबी देवीची रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  • Share this:

पटना, 11 जुलै: मेहुणीवर प्रेम जडलेल्या पतीनं स्वत:च्याच बायकोला मारण्यासाठी बँकेतून लोन काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतून लोन काढून गर्भवती पत्नीला जीवे मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील गोपाळपूर पोलीस स्थानक परिसरात घडली आहे.

9 जुलै रोजी गर्भवती रुबी देवीची रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा धक्कादायक खुलासा शनिवारी पोलिसांना झाला आहे. रुबी आणि तिच्या पतीमध्ये वैवाहिक जीवनात अनेक खटके उडत होते. त्यामध्ये आधीच दोन मुली होत्या आणि तिसरीही मुलगीच होईल या भीतीनं पतीनं रुबीच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने 50 हजार रुपयांची रोख रक्कम हत्या करणाऱ्या व्यक्तीला दिली होती तर उरलेली रक्कम काम झाल्यावर देण्यात येईल असं सांगितलं.

हे वाचा-प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला वीजेचा करंट, बेडरूममध्ये मृतदेहाजवळ काढली रात्र

नेमकं काय आहे प्रकरण, पोलिसांनी कसं उलगडलं गूढ

मिळालेल्या माहितीनुसार, पटना येथील परसा बाजारातील जक्कनपूर येथील रहिवासी पती शंभूचा लॉन्ड्रीचा धंदा आहे. ऑक्टोबरमध्ये त्याची एका तरुणाशी ओळख झाली. त्याने या तरुणाला मेहुणीवर प्रेम असल्याचं सांगितलं आणि आपल्या पत्नीची सुपारी दिली.

पत्नीला संपवण्यासाठी गुन्हेगारानं 2 लाख रुपयांची मागणी केली मात्र तेवढे पैसे पतीकडे नव्हते. त्याच्याजवळ असलेले वीस हजार रुपये दिले आणि उरलेलं बँकेतून 30 हजारांचं लोन काढलं. 50 हजार रुपयांची रक्कम देऊन आपल्या पत्नीच्या खूनाची सुपारी दिली. काम झाल्यावर उर्वरित रक्कम देण्याची कबुली दिली.

हे वाचा-हातात पिस्तूल घेत फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करणं तरुणाला पडलं महागात

पती आणि गुन्हेगारानं पत्नीला ठार मारण्याचं षड्यंत्र रचलं आणि त्यानुसार 9 जुलैला हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गोळी झाडणाऱ्या ऋषीचा तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 11, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या