बक्सर, 17 नोव्हेंबर: महिलांनी युवकाला जीवघेणी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला असून महिलांवर स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील बक्सर इथल्या गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला. हत्या झालेल्या युवकाचं नाव मुकेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुकेश आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बक्सर गावात तिच्या घरी गेला. तिथे उपस्थित असलेल्या चार महिलांनी मुकेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मारहाणीत मुकेशचा मृत्यू झाला. त्याची हत्या झाल्याचं महिलांच्या लक्षात येताच त्यांनी कुणाला न कळण्याआधीच मुकेशचा मृतदेह रस्त्याशेजारी टाकून दिला आणि महिला पसार झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी युवकाला जीवघेणी मारहाण करणं आणि त्याची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार महिलांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे बक्सर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गावात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून गावातील हालचालींवर पोलिसांची नजर असणार आहे.
प्रेयसीला थेट तिच्या घरी जाऊन भेटण्याचं धाडस प्रियकराला चांगलच महागात पडलं. महिलांनी घरात येण्याआधीच पकडून युवकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे.
Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन
WhatsApp ग्रुपचं 'हटके' नाव ठेवताय? तुमच्यासह इतर मेंबरचं अकाउंट होईल बॅन
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा