विपिनकुमार दास (दरभंगा), 01 एप्रिल : बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला अत्यंत वाईट पद्धतीने शिक्षा देण्यात आली आहे. महिलेला अर्धनग्न अवस्थेत बांधून तिचे केस कापून तिला जबर मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान या महिलेने गुन्हा दाखल करूनही पोलीस गुन्हा नोंद करून घेत नसल्याची या महिलेने तक्रार केली आहे.
बिहारच्या कामतौैल पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जगदिश साहा नावाचा व्यक्ती त्यांच्या शेजारी राहतो. साहा यांची मुलगी मागच्या काही दिवसांपूर्वी पळून गेली आहे. या मुलीला पळून जाण्यासाठी पिडीत महिलेने मदत केल्याचा आरोप साहा यांनी ठेवला आहे. यावरून साहा यांनी त्या महिलेला अर्धनग्ण करत तिचे केस कापले. यानंतर तिला बेदम मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर
त्यानंतर पीडित महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी 27 मार्च रोजी पोलीस ठाण्यात जाऊन 10 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. यामुळे त्या महिलेच्या कुटुंबातील सर्वजण मदतीसाठी पोलीस मुख्यालयात चकरा मारत असल्याची माहिती देण्यात आली.
दुसरीकडे, पीडित महिला गांधी देवी यांनी सांगितले की, जगदीश दास यांची मुलगी घरातून कशी पळून गेली हे मला माहित नाही. मात्र जगदीश साह त्यांच्या मुलीला पळून जाण्यासाठी मी मदत केली म्हणून माझ्याशी जबरदस्तीने भांडण केले. यानंतर साहा याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला हातपाय बांधून मारहाण केली. यानंतर माझे केसही कापले. याबाबत आम्ही कमतौल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर न्यायाच्या मागणीसाठी मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो असल्याची माहिती त्या महिलेने दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरणातील पीडित गांधी देवी यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 मार्चची आहे. या प्रकरणी 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे. पीडितेच्या शेजारची मुलगी पळून गेल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये शेजाऱ्याने गांधी देवी यांच्यावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. याबाबत आम्ही तपास करत असल्याचे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.