बिहार, 29 मार्च: बिहारची (Bihar) राजधानी पाटणामध्ये (Patna) गुन्हेगारांचा वावर जास्त आहे. जेडीयू नेते दीपक मेहता (JDU leader Deepak Mehta) यांची सोमवारी संध्याकाळी उशिरा काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पक्षनेत्यासोबत दीपक दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्षही होते. सोमवारी सायंकाळी ते पाटण्याला लागून असलेल्या दानापूर येथील घराजवळ बसले होते. बाईकवरुन आलेले गुन्हेगार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्यावर गोळीबार करून फरार झाले.
परिसरात उडाला एकच गोंधळ
गोळी लागल्यानं दीपक रस्त्यावर पडले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळ्यांचा आवाज ऐकून घटनास्थळी जमलेल्या स्थानिक लोकांनी तातडीनं नेत्याला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर मृत दीपक यांच्या कुटुंबात खळबळ उडाली आहे. घरातल्यांची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. मात्र दीपक यांच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कुशवाह यांनी केली कारवाईची मागणी
या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घातला. त्याचवेळी जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचलेले कुशवाह यांनी ट्विट केलं की, पक्षाचे नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक मेहता यांना गुन्हेगारांनी गोळ्या घातल्यानं मी दु:खी आहे. पोलीस-प्रशासनाने गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news