सासुरवाडीत बोलावून जावायाची हत्या, सासू-सासरे आणि बायकोला अटक

सासुरवाडीत बोलावून जावायाची हत्या, सासू-सासरे आणि बायकोला अटक

तरुणाला सासुरवाडीत बोलावून त्याची सासू-सासरे आणि पत्नीनं अमानुष पद्धतीनं हत्या (Brutal Murder) केली आहे.

  • Share this:

गया (बिहार), 24 जानेवारी : तरुणाला सासुरवाडीत बोलावून त्याचे सासू-सासरे आणि पत्नीनं अमानुष पद्धतीनं हत्या (Brutal Murder) केली आहे. या हत्येपूर्वी आरोपींनी तरुणाचे हात-पाय दोरीनं बांधले. त्यानंतर त्याच्यावर चाकूनं वार केले. इतकं केल्यानंतरही आरोपींचं समाधान झालं नाही. त्यामुळे त्याने तरुणाचे कान, नाक आणि डोळ्यात फेविक्विक (Feviquick) टाकलं. हा सर्व प्रकार 3 वर्षांच्या मुलाच्या डोळ्यासमोर सुरु होता.

बिहारमधील (Bihar) गया (Gaya) येथील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. या हत्येनंतर सासरची मंडळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गस्तीवर (patrolling) असणाऱ्या पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सासू-सासरे आणि पत्नीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

गया पोलिसांनी या हत्या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार ‘मुन्ना गुप्ता असं हत्या झालेल्या 25 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. त्याची हत्या पत्नी ज्युली कुमारी, सासरे दुर्गा साव आणि सासू संजू देवी या सर्वांनी मिळून केली. या प्रकरणात ज्युलीचा प्रियकर आणि अन्य एक तरुणही सहभागी होता. हे दोघं सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ज्युली कुमारीचे एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. या विषयावरुन अनेकदा नवरा-बायकोंमध्ये भांडण आणि मारामारी होत असे. गुरुवारी रात्री मुन्नाला ज्युलीनं तिच्या माहेरी बोलावलं. त्यावेळी घरातील सर्वांनी मिळून दोरीला त्याचे हात -पाय बांधले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या शरिरावर चाकूनं वार केले, तसंच त्याच्या डोळे, कान आणि नाकात फेविक्विक टाकले. हा सर्व प्रकार उघड होऊ नये म्हणून बाईकवरील दोन व्यक्ती एका पोत्यात मुन्नाचा मृतदेह नेत होते. त्यावेळी त्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी पाठलाग सुरु करताच ते दोघं मृतदेहाला रसत्यामध्येच टाकून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन मोबाईल, एक मोटारसायकल, फेविक्विकचे रॅपर, एक डब्बा पेट्रो, मिठाचे पाकीट आणि दोरी हे साहित्य जप्त केलं आहे.

या प्रकरातील आरोपींची जलद गतीनं सुनावणी होऊन त्यांना शिक्षा दिली जाईल. तसंच आरोपींना तातडीनं पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षिस दिलं जाणार असल्याची माहिती गयाचे एसएसपी (SSP) आदित्य कुमार यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 24, 2021, 9:44 AM IST

ताज्या बातम्या