अमानूष! महिलेला जिवंत जाळल्याचा VIDEO VIRAL, चार आरोपींना अटक

अमानूष! महिलेला जिवंत जाळल्याचा VIDEO VIRAL, चार आरोपींना अटक

माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला भरदिवसा जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

पाटणा, 13 ऑक्टोबर : माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला भरदिवसा जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 8 ऑक्टोबरचा असून जाळण्यात आलेल्या महिलेचं नाव सजनी देवी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका नवजात बालकाची हत्या केल्याप्रकरणी गावकऱ्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर पुरावे लपवण्यासाठी तिला चक्क जिवंत जाळलं. ही धक्कादायक घटना बिहारमधील अररिया येथे घडली आहे.

महिलेला अमानूष मारहाण

सर्व गावकऱ्यांनी मिळून या महिलेला एका ठिकाणी बांधलं. यादरम्यान अनेकांनी तिला अमानूष मारहाण केली, तर काहींनी तिला जिवंत जाळूया, अशी विधानंही केली.

(वाचा : बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप)

...त्यानंतर रॉकेल ओतून जिवंत जाळलं

ही घटना घडण्यापूर्वी गावकऱ्यांनी काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सजनी देवीवर बाळ चोरी करून त्याची हत्या केल्याचा आरोप केला. या आरोपावरूनच गावकऱ्यांनी चोप दिल्याचं म्हटलं जात आहे. बेदम मारहाणीनंतर सजनी देवीवर रॉकेल ओतून जिवंत जाळण्यात आलं.

(वाचा :पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?)

चार आरोपींना अटक

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.

(वाचा : पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळला होता पती, पत्नीला संपवूून केली आत्महत्या)

SPECIAL REPORT: ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 07:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading