Home /News /crime /

बाईकवरून आले आणि 10 मिनिटांत 10 कोटींचे दागिने लुटले, पाहा दरोड्याचा थरारक VIDEO

बाईकवरून आले आणि 10 मिनिटांत 10 कोटींचे दागिने लुटले, पाहा दरोड्याचा थरारक VIDEO

14 किलो सोन आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन 8 दरोडेखोर फरार होणार तेवढ्यात काय घडलं पाहा VIDEO

    दरभंगा, 10 डिसेंबर : एक दोन नाही तर 8 बाईकस्वार चोरांनी अवघ्या 10 मिनिटांत दुकान साफ करत 10 कोटी रुपयांचे दागिने आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात बुधवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या 8 गुन्हेगारांनी 10 मिनिटांत दागिन्यांच्या दुकानातून दहा कोटी रुपयांचे दागिने लुटले. शहरातील वाढणाऱ्या दरोड्यांमुळे पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही का? असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत. दुकानाचे मालक सुशील लाठ यांचे बंधू संतोष लाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता दुकान सुरू केलं. सुशील यांच्यासह 6 कर्मचारी दुकानात उपस्थित होते. बाईकवरून आलेल्या 8 जणांनी दुकानात जबरदस्तीनं घुसखोरी केली. 5 जण दुकानात शिरले तर 3 जण बाहेर पाहारा देत होते. एकानं सुशील यांच्यावर बंदूक ताणली आणि त्यांना बेदम मारहाण करून जखमी केलं. पुढच्या 10 मिनिटांत 5 जणांनी संपूर्ण दुकान आणि पैसे दोन्ही बॅगेत भरून 8 जण दुचाकीवरून फरार झाले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-सासरच्या मंडळींना विषारी दूध पाजून नवी नवरी फरार हा दरोडा इतका प्लॅन आखून तयार करण्यात आला होता की त्याचा मागमूसही आजूबाजूच्या दुकानदाराला लागला नाही. दरोडोखोर दुकानातून जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्यावेळी परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. दरोड्यादरम्यान एक कर्मचारी गोळी लागून जखमी देखील झाला आहे. या संपूर्ण दरोड्यादरम्यान पळ काढत असताना एका गुन्हेगाराच्या हातातून दागिन्यांनी भरलेली बॅग रस्त्यावर पडली. गुन्हेगार बॅग सोडून पळून गेला. नंतर सुशील लाठ यांनी ती बॅग उचलून दुकानात आणली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि व्हिडीओच्या आधारे तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bihar

    पुढील बातम्या