कैमूर, 25 डिसेंबर : बिहारच्या कैमूरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीसोबत बलात्काराची (4 Year old girl rapped) धक्कादायक घटना घडल्याची बाब समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांचा पारा चढला. त्यांनी तरुणाला पकडून मारहाण केली. आरोपी तरुण कबार गावातील होता आणि पीडित कुटुंबाच्या शेजारी राहत होता. आरोपीचं नाव सीपू कुमार असल्याचे सांगितलं जात आहे. तो नळ योजनेत ऑपरेटरचं काम करीत होता.
पोलिसांनी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या वक्तव्याच्या आधारावर मुलीच्या काकांना हत्येच्या आरोपात अटक करीत तुरुंगात रवानगी केली आहे. सध्या या प्रकरणातील तपास सुरू आहे. दोन्ही पक्षांद्वारे पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने आरोप लावला आहे की, आरोपी तरुणाने 4 वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पंचायत भवनमध्ये घेऊन गेला होता. येथे तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा मुलीने घरात ही बाब सांगितली तेव्हा सर्वांचाच राग अनावर झाला. त्यानंतर कुटुंबीय घराबाहेर पडले व आरोपी तरुणाचा शोध घेऊ लागले. सांगितलं जात आहे की, आरोपी झाडावर चढून लपून बसला होता. त्याला खाली उतरवण्यात आली आणि त्याला मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला.
हे वाचा-अरे बापरे! हे काय... 80 वर्षीय आजोबांचं पोटाचं ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरही शॉक
मृत तरुणाच्या बहिणीने सांगितलं की, मुलगी दोन दिवसांपूर्वी येथे खेळायला आली होती आणि खेळत असताना शिडीवरुन खाली पडल्यानंतर तिला खरचटलं. त्यानंतर तिच्या (आरोपी) भावाने तिला उचलून घेतलं व तिला खायला देऊ लागला. या गोष्टीवरुन त्यांची चुकीचा समज करुन घेतला व त्याला मारहाण करू लागले. एसपी दिलनवाल अहमद यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षाकडून याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, एका पक्षाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्याने मारत असताना जीव घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकारणाचा तपास कीरत आहे. हत्येच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.