ठाणे, 23 नोव्हेंबर : ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेख याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ठाण्यातील राबोडी परिसरात ही घटना घडली असून जमील यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र पोलीस अजूनही हत्येला दुजोरा देत नसून, वैद्यकीय अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितलं आहे.
शवविच्छेदनासाठी जमील शेख यांचा मृतदेह मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आला आहे. तर दुसरीकडे घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, जमील शेख यांच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनसे पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप
जमील शेख यांच्या हत्येमागे राबोडीतील राजकीय नेत्यांचा हात आहे, असा थेट आरोप स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडून सर्व बाबींचा विचार करत पुढी तपास करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.