Home /News /crime /

महिलांचे लचके तोडणाऱ्यांना फाशीच! तरुणीवर बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्याला कोर्टाकडून मोठी शिक्षा

महिलांचे लचके तोडणाऱ्यांना फाशीच! तरुणीवर बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्याला कोर्टाकडून मोठी शिक्षा

बलात्कार प्रकरणात कोर्टाने मोठी शिक्षा सुनावली आहे.

    हाथरस, 23 सप्टेंबर : हाथरसमध्ये (Uttar pradesh Hathras News) दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Minor Rape and Murder) आणि त्यानंतर हत्या करणाऱ्या आरोपींना कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय हाथरस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पॉक्सो कोर्टाने एका आरोपीवर 50 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. (Big punishment from court for raping a young girl and burning her alive ) मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये आरोपीने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. यानंतर त्याने तिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळलं होतं. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुग्णालयात पीडितेकडून दिलेल्या जबाबानुसार कोर्टात आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली. महत्त्वाचं म्हणजे सिकंदराराऊ पोलिसांनी 16 एप्रिल 2019 रोजी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. हे ही वाचा-भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, मुंबईतील घटनेने खळबळ काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका 30 वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 23 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape, Murder, Rape case, Uttar pardesh

    पुढील बातम्या