Home /News /crime /

भिवंडीत या कारणामुळे भात पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

भिवंडीत या कारणामुळे भात पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

परतीच्या पावसामुळे भातपिकं मातीमोल झाली असताना...

भिवंडी, 1 नोव्हेंबर: परतीच्या पावसाने (Heavy Rain) भातपिकं मातीमोल झाली असताना भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील शिरोळे गावच्या हद्दीतील दगड खदानी, क्रेशर मुळे 100 एकर भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. भातसा उजवा तिर कालवादेखील ब्लास्टिंगमुळे खचला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कालव्याच्या 300 मिटर अंतरावर असून दगड खदान, क्रेशर आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील महसूल विभाग, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तीन शेतकऱ्यांनी कुटुंबासह 2 नोव्हेंबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा... तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पॉर्न साइटवर टाकायचा व्हिडिओ, असं फुटलं बिंग.. भिवंडी तालुक्यातील शिरोळे गावच्या हद्दीतील भात पीकांसह भाजीपाला, तूर, मूग हरबरा, वाल अशी पिके घेतली जातात. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी दुसऱ्या महसूल अधिकाऱ्यांना भागीदारीमध्ये घेऊन येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीवर भरणी केली तसेच  90 लाख दंड झालेल्या दगड खदानं बुजवून शासनाचा महसूल बुडवला. त्याचप्रमाणे या दगड खदान, क्रेशर मुळे 100 एकर भातशेती नापीक होत आहे. तर फक्त 300 मिटर अंतरावर ही खदान असून त्यामुळे ब्लास्टिंगमुळे कालवा खचला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भिवंडीचे प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी यांना हाताशी धरून खोटे अहवाल सादर करून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शासनाचा महसूल बुडवला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच गावातील निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या जमिनीतील माती चोरी करून क्रेशरसाठी भराव केला. या दगड खदान, क्रेशरमुळे या परिसरातील तब्बल शंभर एकर भातसशेतीच नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलिसांना तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. हेही वाचा.. पुणे लष्करी भरती रॅकेट! परीक्षेत पास करून देण्याचं आमिष दाखवून तरुणांना गंडवलं 3 पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा  इशारा दिला आहे. उद्या, 2 नोव्हेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितसं आहे. मात्र, त्यावर प्रशासनने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी तरी न्याय मिळेल का? अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे..
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या