विजय मल्ल्याच्या फ्रान्समधील संपत्तीवर ED ची कारवाई; प्रॉपर्टीची किंमत वाचून व्हाल हैराण

विजय मल्ल्याच्या फ्रान्समधील संपत्तीवर ED ची कारवाई; प्रॉपर्टीची किंमत वाचून व्हाल हैराण

विजय मल्ल्याची लवकरात लवकर भारतात रवानगी करावी यासाठी भारत सरकारने ब्रिटीश सरकारकडे अनेक महिन्यांपासून तगादा लावला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे (Kingfisher Airlines ) ​​मालक आणि फरार असलेले मद्य व्यवसायिक विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांच्या विरुद्ध सक्तवसुली संचलनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी ईडीने विजय मल्ल्याची फ्रान्समधील (France) तब्बल 1.6 दशलक्ष युरोची संपत्ती जप्त केली आहे. विजय मल्ल्यावर कारवाई केल्यानंतर ईडीने अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.  'ईडीच्या विनंतीवरून फ्रेंच प्रशासनाने विजय माल्ल्याची 32 अव्हेन्यू फोच (FOCH) येथील मालमत्ता जप्त केल्याची माहिती ईडीने ट्वीटरद्वारे दिली.

फ्रान्समधील जप्त केलेल्या संपत्तीचे एकूण मूल्य 1.6 दशलक्ष युरो (अंदाजे 14.34 कोटी रुपये) आहे. त्याचबरोबर परदेशात किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढून घेण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

येथे नमूद करावयाची महत्त्वाची बाब म्हणजे , विजय मल्ल्या हा भारतीय मद्य व्यावसायिक असून तो नऊ हजार कोटीहून अधिक रुपयांच्या  बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये राहत आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने काही महिन्यांपूर्वी युनायटेड किंगडम (यूके) सरकारला विनंती केली होती. विजय मल्ल्याची लवकरात लवकर भारतात रवानगी करावी यासाठी भारत सरकारने ब्रिटीश सरकारकडे अनेक महिन्यांपासून तगादा लावला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 4, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या