मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

परपुरुष घरात येतो का? कोळ्यांच्या जाळ्याच्या मदतीने पतीची हेरगिरी

परपुरुष घरात येतो का? कोळ्यांच्या जाळ्याच्या मदतीने पतीची हेरगिरी

पती-पत्नीमधील भांडण काही नवीन नाही. जगभरात दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. पण आपल्या पत्नीची हेरगिरी करण्यासाठी कुणी पती कोळ्याच्या (Spider) जाळ्यांचा वापर करत असेल तर?, असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

पती-पत्नीमधील भांडण काही नवीन नाही. जगभरात दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. पण आपल्या पत्नीची हेरगिरी करण्यासाठी कुणी पती कोळ्याच्या (Spider) जाळ्यांचा वापर करत असेल तर?, असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

पती-पत्नीमधील भांडण काही नवीन नाही. जगभरात दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. पण आपल्या पत्नीची हेरगिरी करण्यासाठी कुणी पती कोळ्याच्या (Spider) जाळ्यांचा वापर करत असेल तर?, असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

भोपाळ, 4 फेब्रुवारी : पती-पत्नीमधील भांडण काही नवीन नाही. जगभरात दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. पण आपल्या पत्नीची हेरगिरी करण्यासाठी कुणी पती कोळ्याच्या (Spider) जाळ्यांचा वापर करत असेल तर?, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal) अशाच पद्धतीची एक विचित्र घटना समोर आली आहे. पती आपल्या पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये कोळ्यांचं जाळं लावत होता. हे जाळे अस्ताव्यस्त झालेलं दिसलं की तो आपल्या पत्नीवर संशय घेत होता. यामुळे पत्नीने कुटुंब न्यायालयात धाव घेतली असून घटस्फोटाची मागणी केली आहे.

भोपाळमधील या दाम्पत्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते. टेक्निकल ऑफिसर असलेला पती आपल्या कारनाम्यांनी त्रास देत असल्याचा आरोप या महिलेनं कौटुंबिक न्यायायलात केला आहे. आपल्याला पतीबरोबर राहायचं नसून कुठल्याही परिस्थितीत या महिलेनं घटस्फोटाची मागणी केली आहे. न्यायालयाने काऊन्सिलरच्या माध्यमातून या दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये त्यांना अपयश आलं असून महिलेनं वेगळं राहण्याचा निर्णय नक्की केला आहे.

न्यायालयातील काऊन्सिलर सरिता राजानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या लग्नाला 15 वर्ष झाली असून पती भोपाळमधील एका कंपनीत टेक्निकल ऑफिसर आहे. या दोघांना 12 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी आहे. आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून या महिलेनं कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. यामध्ये आपला पती खूप विचित्र वागत असून त्यानं घरामध्ये कोळी पाळले असून विचित्र हरकती करतो, असा आरोप पत्नीने केला आहे.

नातेवाईक आणि इतर लोकांना घरात येण्यास मनाई

या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार काऊन्सिलर सरिता राजानी यांनी सांगितलं की, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. परपुरुषास घरात येण्यास देखील बंदी घातली आहे. कुणी नातेवाईक घरात आल्यास तो महिलेला मारहाण करत असल्याचं देखील तिनं सांगितलं. यामुळं तिने अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील त्याने आपल्या पत्नीला मारहाण करत मोठ्या प्रमाणात जखमी केलं होतं. महिलेचा नातेवाईक तिच्या घराजवळून जात असताना तिला भेटायला आला होता. यावेळी तिच्या पतीने सीसीटीव्ही फुटेज आपल्या मोबाईलवर पाहत तिला घरी कोण आलं होतं असा प्रश्न विचारला. यावर तिने सांगितलं असता आणखी एकजण देखील होता असं म्हणत तिला प्रचंड मारहाण केली. यामुळं संतापलेल्या महिलेनं घर सोडत थेट माहेर गाठलं.

महिला आजही असुरक्षित

कौन्सिलर सरिता राजानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं घटस्फोट घेण्याचा निर्णय नक्की केला आहे. मुलांची जबाबदारी पतीला हवी असेल तर ती त्याने घ्यावी अन्यथा महिला मुलांना देखील सांभाळण्यास तयार आहे. यावेळी काऊन्सिलर सरिता राजानी यांनी समाज बदलला असून डॉक्टर किंवा इंजिनिअर असाल तर तुमची वैचारिक पातळी देखील उंचावलेली असेल असं काही नसल्याचं म्हटलं आहे.

First published: