मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जोडप्याचा वाद आणि तिसऱ्याचं मरण, पतीने मधे आलेल्या कार्यकर्त्यालाच केलं ठार

जोडप्याचा वाद आणि तिसऱ्याचं मरण, पतीने मधे आलेल्या कार्यकर्त्यालाच केलं ठार

पती- पत्नीमध्ये समझौता करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचाच या वादात बळी गेला.

पती- पत्नीमध्ये समझौता करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचाच या वादात बळी गेला.

पती- पत्नीमध्ये समझौता करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचाच या वादात बळी गेला.

भिवंडी, 8 जानेवारी : पती- पत्नीमध्ये समझौता करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचाच या वादात बळी गेला. भिवंडीत एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पती- पत्नीमधला तणाव दूर करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या गैरसमजातून पतीनेच त्याचा निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. दरम्यान तरुणाचा खून करून हल्लेखोर पळू लागताच संतप्त जमावाने मजबूत चोप दिल्याने तोसुध्दा गंभीर जखमी झाला आहे. असून दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला.

भिवंडीतील अजंटा कंपाऊंडमध्ये इम्रान सय्यद आणि त्यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून राहात होते. मात्र मागील काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळं दोघे वेगवेळे राहत होते. पती-पत्नीमध्ये समझौता करण्याठी सामाजिक कार्यकर्ते असलेल्या तरुणानं पुढाकार घेतला. मात्र पती इम्रानचा गैरसमज झाला आणि त्यानं नदीमचा काटा काढण्याचं ठरवलं. इम्रानने त्याच्या मित्राच्या मदतीने नदीमला मारण्याचा घाट घातला.

पती-पत्नीमध्ये समझौता करण्यासाठी त्यांच्या परिसरातील नदीम मोमीन या तरुणानं पुढाकार घेतला. दोघांमध्ये नदीम या तरुणानं समेट घडवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नदीममुळेच आपली पत्नी घरी येत नसल्याचा इम्रानचा समज झाला.  त्यामुळं इम्राननं नदीमचा काटा काढण्याचं ठरवलं.

मध्यरात्रीनंतर नदीम बाईकरून मोबाईलच्या दुकानातून घरी जात असताना त्याला इम्रान आणि त्याच्या मित्रानं वाटेत अडवलं. बाईकरून नदीमला खाली पाडलं. त्यानतंर  इम्रान आणि त्याच्या मित्रानं नदीमवर चाकूनं सपासप वार केले. नदीमच्या छातीवर चाकूचे वार करून  इम्रान आणि त्याचा मित्र फरार झाले. या हाणामारीची माहिती कळताच घटनास्थळी नदीम यांचे काही साथीदार युवक धावून आले. हल्लेखोर पळू लागताच दोघा हल्लेखोरांपैकी एकास पकडून त्याला संतप्त जमावाने मजबूत चोप दिल्याने तोसुध्दा गंभीर जखमी झाला असून दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. जखमी नदीम मोहम्मद ला वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटल मध्ये उपचारा करीता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले .तर संतप्त नागरीकांच्या मारहाणीत गंभीर  जखमी हल्लेखोर इम्रान रसूल सय्यद ,31,रा. चौहान कॉलनी यास उपचारा साठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . घटनास्थळी भोईवाडा पोलिसांनी दाखल होत पंचनामा करून दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून नदीम मोहम्मद हा मोबाईल दुकानासह परिसरात समाजसेवक म्हणून ही परिचित होता. 2017 मधील महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढविली होती .नेमके हत्या करण्यामागे असलेल्या कारणांचा पोलिसां कडून शोध घेतला जात आहे.

--------------------

अन्य बातम्या

पोटच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता HIV बाधीत बाप

पंढरपुरात मठामध्ये रक्ताचा सडा, मठाधिपतींची निर्घृण हत्या

'भाजपचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत, काँग्रेसचा मंत्रीच घडवेल राजकारणात भूकंप'

First published: