भिवंडीत अपहरण झालेल्या मुलीची उत्तर प्रदेशातून सुटका, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना!

भिवंडीत अपहरण झालेल्या मुलीची उत्तर प्रदेशातून सुटका, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना!

या मुलीची भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधून सुखरूप सुटका केली आहे.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी, 1 फेब्रुवारी : भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. या मुलीची भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधून सुखरूप सुटका केली आहे. तसंच तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिलं आहे.

भिवंडीतील वाढत्या अपहरणाच्या घटना लक्षात घेता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन मुलीचा तपास लवकर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक तानाजी वाघ ,पोलीस नाईक अरविंद गोरले, महिला पोलीस शिपाई योगीता शिंदे यांनी तपास सुरु केला.

पोलीस तपासात मिळालेल्या मोबाईलचे नंबर मोबाईल टॉवर लोकेशनच्या साह्याने ट्रेस केले. त्यानंतर अपहरण झालेली मुलगी उत्तर प्रदेशच्या बहरियाबाद, जिल्हा गाझीपूर इथं असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच या पथकाने तात्काळ उत्तरप्रदेशात धाव घेतली आणि स्थनिक पोलिसांच्या साहाय्याने घटनास्थळी जाऊन त्या अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका केली.

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला बेड्या

या मुलीला भिवंडीत आणून तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. काही दिवस बेपत्ता असलेली मुलगी पुन्हा आल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी पोलिसांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published: February 1, 2020, 9:20 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या