भिवंडी, 14 डिसेंबर : भिवंडीत फरार आरोपी पकडताना पोलिसांबरोबर महिलांनी हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यातील हाणामारीच्या गुन्ह्यातील आरोपी अली अकबर उर्फ जग्गू हा फरार होता. अली अकबर हा पिरानी पाडा परिसरातील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेऊन दुचाकीवारीवरून जाताना पकडले.
आरोपीला पकडताना तेथील महिलांनी चांगलाच राडा घालून पोलिसांच्या तावडीतून आरोपी जग्गू याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धक्काबुक्की सुद्धा झाली. मात्र पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याची दुचाकीही चोरीची असल्याचे समोर आले आहे. मात्र पिरानी पाडा या परिसरात नेहमीच पोलीस आणि नागरिकांचा वाद पाहावयास मिळत आहे.
अली अकबर याच्यावर गुन्हा रजि नंबर 229/20 भादंवि अनव्ये प्रमाणे 326, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता. तो या गुन्ह्यात फरार असताना पोलीस आर. आर चौधरी, रवि चौधरी, गणेश हरणे यांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. मात्र इराणी समाजातील महिलांनी राडा घातला. तरीही पोलिसांनी धडक कारवाई करून त्याला अटक केली. तसंच त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.