41 वर्षीय महिलेनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, टिंडर अ‍ॅपवर मैत्री झाल्यानंतर तरुणाला घरी बोलावलं आणि...

41 वर्षीय महिलेनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, टिंडर अ‍ॅपवर मैत्री झाल्यानंतर तरुणाला घरी बोलावलं आणि...

त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वत:च्या घरी बोलावले आणि लगट करून त्याला एका खोलीत डांबले.

  • Share this:

भिवंडी, 4 नोव्हेंबर : भिवंडी परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने 41 वर्षीय व्यक्तीशी टिंडर अ‍ॅपवरून मैत्री केली. यानंतर त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वत:च्या घरी बोलावले. लगट करून त्याला एका खोलीत डांबले. त्यानंतर 4 साथीदारांशी संगनमत करून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिने बँक खात्यातून 3 लाख 87 हजार तर क्रेडिट कार्डवर 2 लाख 20 हजार रुपयांचे दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करून 6 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीने आरोपी महिलेसह तिच्या 4 अनोखळी साथीदारांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दिपाली जैन असं संशयित आरोपी महिलेचं नाव असून तिने मितुल लिबांनी या व्यक्तीला गंडा घातला आहे .

दिपालीचा ऑनलाईन डाव, घातला सहा लाखांचा घाव!

भिवंडीतील अरिहंत सिटी या हायप्रोफाईल सोसायटीत दीपाली जैन राहते. तिने काही दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई परिसरात राहणाऱ्या मितुल याच्यासोबत टिंडर अॅपवरून मैत्री करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमाची भुरळ घालत त्याच्याशी चॅटिंग सुरू केली. नेहमीप्रमाणे 2 नोव्हेंबर रोजी आरोपी दिपालीने मोबाइलवर चॅटिंग करून त्याला भिवंडीतील घरी बोलवले.

दुपारच्या सुमाराला तो घरी पोहचताच तिने लगट करून त्याला एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर तिने 2 महिला व 2 पुरुष साथीदारांना घरी बोलावून मितुल यास मारहाण केली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्या विविध बँकेतील खात्यात जमा असलेली तीन लाख 87 हजार रुपयांची रक्कम आरोपी दिपालीने तिच्या बँक खात्यात वळती केली.

तसेच मितुलच्या क्रेडिट कार्डवर तिने 2 लाख 20 हजार रुपयांचे दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करून एकूण सहा लाखांचा डाव साधला. तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

...आणि तिने प्रेमाच्या मेसेजसह बँक आणि क्रेडिट कार्डचेही मेसेज केले डिलीट

विशेष म्हणजे टिंडर अ‍ॅप व मोबाइलवरून दिपालीने मितुल यास पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. तसेच बँक व क्रेडिट कार्डवरून त्याच्या मोबाइलवर आलेले मॅसेजही डिलीट केले. याप्रकरणी मितुलने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी भादवी. कलम 314, 384, 388, 389, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सह पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या