मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Jaipur Murder डॉक्टर दाम्पत्याची हत्या बदल्याच्या भावनेतून, बहीण-भाच्याला जाळून मारल्याच्या मनात होता राग

Jaipur Murder डॉक्टर दाम्पत्याची हत्या बदल्याच्या भावनेतून, बहीण-भाच्याला जाळून मारल्याच्या मनात होता राग

Bharatpur Murder आरोपींनी रेकी करून या दाम्पत्याचा पाठलाग केला होता. त्यानंतर भर रस्त्यात त्यांना अडवून गोळ्या घालत हत्या करण्यात आली.

Bharatpur Murder आरोपींनी रेकी करून या दाम्पत्याचा पाठलाग केला होता. त्यानंतर भर रस्त्यात त्यांना अडवून गोळ्या घालत हत्या करण्यात आली.

Bharatpur Murder आरोपींनी रेकी करून या दाम्पत्याचा पाठलाग केला होता. त्यानंतर भर रस्त्यात त्यांना अडवून गोळ्या घालत हत्या करण्यात आली.

  • Published by:  News18 Desk

जयपूर, 29 मे : भरतपूर (Bharatpur) शहरात नीम दा गेटजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन तरुणांनी भर रस्त्यात प्रसिद्ध डॉक्टर सुदीप गुप्ता (Sudip Gupta) आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सीमा गुप्ता (Seema Gupta) यांची गोळ्या घालत हत्या केली होती. घटनेनंतर आरोपींनी हवेत फायरिंग करत तिथून फरार झाले होते. विशेष म्हणजे बाईकला धक्का मारत तो साथीदारासह फरार झाला. CCTV फुटेजमध्ये एका तरुण अनुज गुर्जर (Anuj Gurjar) आणि दुसरा त्याचा नातेवाईक महेश असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा सर्व प्रकार बदला घेण्याच्या रागातून झाल्याचं समोर आलं आहे.

(वाचा- Vasai : पोलिस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, टाटांशी संबंध असल्याच्या करायचा बाता)

दोन वर्षांपूर्वी लाखों रुपये किंमत असलेल्या एका बंगल्यात जीवंतपणी जाळून मारलेल्या दीपा गुर्जर आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा शौर्य यांच्या हत्याकांडाशी या घटनेचा संबंध आहे. भरतपूर पोलिसांच्या मते, हत्या प्रकरणात सहभागी अनुज गुर्जर आगीत जळून मेलेल्या दीपा गुर्जर उर्फ रिया गुर्जरचा भाऊ आहे. सध्या तो फरार आहे.

दीपाने भावाला बोलावलं होतं फोन करून

7 नोव्हेंबर 2019 ला बंगल्यात आगेच्या ज्वाळांनी घेरलेल्या दीपानं तिचा लहान भाऊ अनुजला फोन करून मदतीसाठी बोलावलं होतं. अनुज सूर्या सिटीमध्ये असलेल्या डॉक्टर सुदीप गुप्ताच्या या बंगल्यात पोहोचला. त्याठिकाणी गर्दीत मृत डॉक्टर गुप्ता दाम्पत्यही होतं. अनुजनं बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोच याच भाजला.

(वाचा-वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींचं धक्कादायक कृत्य; भावाची हत्या)

डॉ. सीमा गुप्ताने लावली होती आग

डॉ. सुदीप आणि त्यांच्या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेली दीपा गुर्जर यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समजल्यानं 7 नोव्हेंबर 2019 ला डॉक्टर सुदीप यांची पत्नी सीमा सासूबरोबर सूर्या सिटी येथील बंगल्यात पोहोचली होती. याचठिकाणी डॉक्टर सुदीपने दीपा गुर्जरला ठेवलेलं होतं. याठिकाणी दीपा आणि सीमा यांच्यात वाद झाले होते. डॉक्टर सीमाने सोबत स्पिरिट नेलं होतं. रागात तिनं स्पिरिट ओतलं आणि दीपा तसंच तिचा मुलगा शौर्य याला खोलीत कोंडून आग लावली होती. त्यात जळून दोघांचा मृत्यू झाला होता.

अनुजनं या घटनेचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. दामप्त्य तुरुंगातून आल्यापासून तो त्यांची रेकी करत होता. अखेर त्यानं 28 मे रोजी सायंकाळी त्यांना गोळ्या झाडून ठार केलं.

First published:

Tags: Crime news, Jaipur, Murder news