मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कंपनीच्या प्रवेशद्वारावर मृतदेह घेऊन गावकऱ्यांचा आक्रोश, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

कंपनीच्या प्रवेशद्वारावर मृतदेह घेऊन गावकऱ्यांचा आक्रोश, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कंत्राटी कामगार असलेल्या कामगारावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच त्याला कामावरून कमी करण्यात आल्याने नैराश्यात गेलेल्या एका कामगाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Chetan Patil

नेहाल भुरे, भंडारा, 28 सप्टेंबर : कंत्राटी कामगार असलेल्या कामगारावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच त्याला कामावरून कमी करण्यात आल्याने नैराश्यात गेलेल्या एका कामगाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी मृतक कामगाराच्या संतप्त झालेल्या कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी मृतदेहासह मारेगाव येथील एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीच्या द्वारावर आंदोलन केलं. कंपनी प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला देत नोकरीवर घ्यावे या मागणीसाठी सुमारे चार तासांपासून आंदोलन सुरू आहे. मोरेश्वर उत्तम भोयर (वय 32) असं आत्महत्या करणाऱ्या कामगाराचं नाव आहे. ते मारेगाव (गोपीवाडा) येथील रहिवासी होते.

भंडारा तालुक्यातील मारेगाव येथे एमएमपी इंडस्ट्रीज आहे. या कंपनीत ज्वलनशील ॲल्युमिनियम मेटल पावडर आणि पेस्टची निर्मिती होते. या कंपनीत कुशल आणि अकुशल असे शेकडो कामगार काम करत आहेत. मोरेश्वर यांची शेती कंपनीने अधिग्रहित केली होती. मात्र त्यांना कामावर कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले होते. 24 सप्टेंबरला मृतक मोरेश्वर यांचा कंपनीतील एका अधिकाऱ्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. यातूनच सदर अधिकाऱ्याने जवाहर नगर पोलीस ठाण्यात मोरेश्वर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत कामावरून कमी केले होते. तेव्हापासून मोरेश्वर हे विचाराधीन राहत होते.

(सिंधुताई सपकाळ अनाथालयाच्या नावाने घातला जातोय ऑनलाईन गंडा! काय आहे प्रकरण जाणून घ्या)

याच विवंचनेत मोरेश्वर यांनी टोकाची भूमिका घेत मंगळवारी विषप्राशन करून आत्महत्या केली. मोरेश्वरच्या आत्महत्येला कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी करीत त्याचा मृतदेह एमएमपी इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारावर आणला. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भंडारा पोलिसांचे अतिरिक्त कुमक कंपनी परिसरात पाचारण करण्यात आले आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime