मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमासाठी कायपण! रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी तिच्याच घरावर मारला डल्ला; असं फुटलं बिंग

प्रेमासाठी कायपण! रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी तिच्याच घरावर मारला डल्ला; असं फुटलं बिंग

Crime In Betul: आपल्या रुसलेल्या प्रेयसीच्या (Girl Friend) नजरेत पुन्हा हिरो बनण्यासाठी प्रियकराने तिच्याच घरावरच डल्ला मारला (Lover Committed theft in girlfriend house) आहे. पण हा बनाव प्रियकराच्या चांगलाच अंगलट आला आहे.

  • Published by:  News18 Desk

बैतूल, 04 मार्च: रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रियकराने एक अजब थरारनाट्य रचल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने प्रियकराने प्रेयसीच्याचं घरात चोरी करून तिचं सामान परत केल्याची एक चित्र विचित्र घटना समोर आली आहे. यावेळी प्रियकराने आपल्या जीवावर खेळून हे सामान चोरट्यांकडून परत मिळवल्याचा बनाव रचला होता. या विचित्र घटनेमुळे प्रियसीचा फुगवा गेला की नाही? हे माहित नाही. पण अशाप्रकारे चोरी करणं प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. कारण पोलिसांनी या मजनू भाईचं बिंग फोडलं असून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  2 मार्चच्या रात्री बैतूलच्या महावीर वॉर्डातील एका घरात चोरी झाली होती. या चोरीची कल्पना संबंधित कुटुंबालाही माहित नव्हती. कारण ज्यादिवशी चोरी झाली त्या दिवशी संबंधित घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले होते. घरातील सर्व सदस्य जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घराशेजारी राहणारा प्रेम खडसे नावाचा मुलगा हातात काही सामान घेऊन चोरी झालेल्या घरासमोर उभा होता.

यावेळी प्रेमने प्रेयसीच्या घरच्यांना सांगितलं की, तुमच्या घरात चोरी करून दोन चोरटे पळून जात होते. त्यावेळी मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर लॅपटॉप आणि काही दागिने तिथेच टाकून चोरट्यांनी पळ काढला. प्रियकराच्या या बनावावर परिसरातील अनेकांनी विश्वास ठेवला. यानंतर पीडित परिवारने घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा -तोतया पोलीस बनून महिलेची फसवणूक; बनावट कागदपत्रे दाखवून ठेवले शारिरीक संबंध

असं फुटलं बिंग

एसडीओपी (मुलताई) नम्रता सोंधिया यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला प्रेमच्या बोलण्यात अनेक तफावती आढळल्या होत्या. तसेच त्याने सांगितलेली कहाणी बनावट वाटत होती. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी कसून  चौकशी केली असता अखेर प्रेमने खरी माहिती उघड केली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, ज्या घरात त्याने चोरी केली आहे. त्या घरात त्याची प्रेमिका राहते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दोघांत खटकलं होतं. त्यामुळे प्रियसीच्या नजरेत पुन्हा हिरो त्याने हा कट रचला होता.

हे ही वाचा - संतापजनक! अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर चार मित्रांचा सामूहिक बलात्कार

प्रेमच्या कबुलीनंतर, पोलिसांनी आरोपी प्रेमच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना प्रेमच्या घरातील स्पीकरमध्ये चोरी केलेल्या वस्तू आणि 92 हजार रुपये रोकड आणि सोन्याचे दागिनेही सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेमला न्यायालयात हजर केलं असून आता त्याची रवानगी थेट तुरूंगात केली आहे.

First published:

Tags: Boyfriend, Crime news, Girlfriend, Theft