मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नागपूरमध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरमध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील मसाळा शिवारात असलेल्या फार्म हाऊसमधील क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड टाकली.

कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील मसाळा शिवारात असलेल्या फार्म हाऊसमधील क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड टाकली.

कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील मसाळा शिवारात असलेल्या फार्म हाऊसमधील क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड टाकली.

    नागपूर, 27 ऑक्टोबर : नागपूरमध्ये (Nagpur ) आयपीएल (IPL) सामन्यावर सट्टा लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 13 लाख 38 हजार 598 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर स्थानिक गुन्हे शाखा (Nagpur Police ) आणि कोंढाळी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील मसाळा शिवारात असलेल्या फार्म हाऊसमधील क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड टाकली. यात क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 13 लाख 38 हजार 598 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. wifi मध्ये अडथळे येतात? या सोप्या ट्रिक्सनी इंटरनेट होईल सुपरफास्ट ही कारवाई शनिवारी  रात्री करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल संघादरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर मसाळा शिवारातील गुलमोहर नामक फार्म हाऊसमध्ये सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या पथकाने कोंढाळी पोलिसांची मदत घेत लगेच त्या फार्म हाऊसची पाहणी केली. तिथे क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याचे स्पष्ट होताच धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली. रायगडमध्येही सट्टा लावणारे मोठं रॅकेट उद्ध्वस्त दरम्यान, आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे एक मोठं रॅकेट 7 ऑक्टोबरमध्ये रायगड पोलिसांनी उद्ध्वस्त  केले आहे. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली. रायगड पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आले. कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी, नवी आकडेवारी आली समोर कर्जत तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने पथकाने कर्जत येथील रिसॉर्टवर धाड टाकली आणि सट्टा खेळणाऱ्यांना अटक केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Crime, नागपूर

    पुढील बातम्या