मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणाला लाखोंचा गंडा; कामोत्तेजक गोळ्यांच्या नावाखाली केली फसवणूक

तरुणाला लाखोंचा गंडा; कामोत्तेजक गोळ्यांच्या नावाखाली केली फसवणूक

कमी वेळात पैसे कमवण्याची सवय वाढत चालली आहे. सुशिक्षित तरुण-तरुणीही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे करतात आणि नंतर अनट्रेसेबल होतात.

कमी वेळात पैसे कमवण्याची सवय वाढत चालली आहे. सुशिक्षित तरुण-तरुणीही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे करतात आणि नंतर अनट्रेसेबल होतात.

कमी वेळात पैसे कमवण्याची सवय वाढत चालली आहे. सुशिक्षित तरुण-तरुणीही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे करतात आणि नंतर अनट्रेसेबल होतात.

मुंबई 8 एप्रिल: सायबर क्राइम (Cyber crime) दिवसेंदिवस वाढत आहे. डिजिटल सुविधांमुळे जगणं जेवढं सोयीचं झालं आहे तितकंच ते जोखमीचं झालं आहे कारण व्यवहारांमध्ये जितकी सहजता आली आहे आणि वेळ वाचत आहे, तितकाच सहज सायबर गुन्हा करता येत आहे. आणि त्यामुळं कमी वेळात पैसे कमवण्याची सवय वाढत चालली आहे. सुशिक्षित तरुण-तरुणीही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे करतात आणि नंतर अनट्रेसेबल होतात.

अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. बंगळुरूतल्या बेल्लांदुर भागात राहणाऱ्या अमन या टॅक्सी ड्रायव्हरला सायबर चोरांनी 2 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानं कामसूत्र सेक्स गोल्ड औषधाच्या गोळ्या विकत घेतल्या. (sex pills) या गोळ्या कामभावना वाढवण्यासाठी घेतल्या जातात. या गोळ्या खरेदी केल्यामुळे तुम्हाला एक मोठ्या रकमेचं बक्षिस देणारं गिफ्ट कार्ड लागलंय असं सांगणारा फोन अमनला आला. याबाबतचं वृत्त बंगळुरू मिररनी दिलं आहे.

अवश्य पाहा - ACB ची धाड पडताच गॅसवर जाळले 5 लाख, तहसीलदार आणि त्याच्या साथीदाराचा भ्रष्टाचार उघडकीस

अमनला दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून मेसेज आणि फोन येत होते. अमननी खरेदी केलेल्या कामसूत्रच्या गोळ्यांच्या पाकिटामुळे त्याला जे गिफ्ट कार्ड लागलंय त्यावर त्याला खूप मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे असं त्याला फोन व मेसेजच्या माध्यमातून भासवण्यात आलं. त्यामुळे त्याने त्यावर विश्वास ठेवला. ते गिफ्ट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल असं सांगून त्या चोरांनी त्याच्याकडून 2.17 लाख रुपये उकळल्याचं अमनच्या नंतर लक्षात आलं. अमनने व्हाइटफिल्ड सीईएन पोलीस ठाण्यात आयटी अक्टअंतर्गत तक्रार नोंदवली आहे. पण या चोरांना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

अवश्य पाहा - अल्पवयीन मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला, बेदम मारहाणीमुळे गेला जीव

त्यामुळेच सायबर क्राइम विभागातील पोलीस आणि विविध सरकारी यंत्रणा ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना वारंवार देत असतात.  गिफ्टच्या मोहापोटी अमनला  दोन लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला.

2019 मध्ये बेंगळुरूतील एका महिलेने ऑनलाइन पद्धतीने पिझ्झा मागवला होता तेव्हा तिला 95 हजार रुपयांचा फटका बसला होता. एन. व्ही शेख या महिलेने ऑनलाइन पद्धतीने पिझ्झा मागवला आणि तिला एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याचं तिला नंतर लक्षात आलं. बेंगळुरूतील कोरोमंगला मधल्या एका रहिवाश्यानी पण ऑनलाइन पद्धतीनेच पिझ्झा मागवला होता. 1 डिसेंबर ला पार्टीसाठी हा पिझ्झा स्मार्टफोनमधील अपमधून मागवण्यात आला होता. त्याचा घरी पिझ्झा पोहोचला पण सोबत त्याला हे लक्षात आलं की त्याच्या बँक खात्यातून 95 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यानंतर त्याला लक्षात आलं की सायबर चोरांनी त्याच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगायला हवी.

First published:
top videos

    Tags: Crime, Cyber crime, Sex racket