जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मी वाईट लोकांना...; CEO अन् MD यांचा खून करण्याआधी त्याने ठेवलेलं व्हॉटसअप स्टेटस

मी वाईट लोकांना...; CEO अन् MD यांचा खून करण्याआधी त्याने ठेवलेलं व्हॉटसअप स्टेटस

बंगळुरु डबल मर्डर केस

बंगळुरु डबल मर्डर केस

खून करण्याआधी आरोपी फेलिक्सने व्हॉटसअप स्टेटस ठेवलं होतं. त्यात त्याने लोक धोकेबाज असतात असं म्हटलं होतं. त्यामुळे मी या ग्रहावरील लोकांना इजा पोहोचवली. मी कधीच चांगल्या लोकांना त्रास दिला नाही. फक्त वाईट लोकांनाच इजा पोहोचवली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बंगळुरू, 12 जुलै : बंगळुरूत एका 27 वर्षाच्या तरुणाने आयटी कंपनीचे सीईओ आणि एमडीची हत्या केल्यानं खळबळ उडाली. ऑफिसमध्ये इतर दोन सहकाऱ्यांसोबत घुसून त्याने दोघांची हत्या केली. सीईओ आणि एमडी या दोघांचा खून करण्याआधी त्याने व्हॉटसअप स्टेटसही ठेवला होता. त्यात म्हटलं होतं की,“फक्त वाईट लोकांनाच इजा पोहोचवायचीय. मी कधी चांगल्या लोकांना त्रास दिला नाही.” पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली आहे. प्रमुख आरोपी फेलिक्सने सोशल मीडियावर जोकर फेलिक्स नावाने अकाउंट तयार केलं होतं. तो टिकटॉकवरही व्हिडीओ टाकत होता. यामध्ये तो नेहमीच स्वत:ला व्हिलन असल्याचे सांगत होता. रंगवलेले केस, चेहऱ्यावर विचित्र टॅट्यू काढून तो जगाला आपण व्हिलन असल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न करायचा. बंगळुरूत त्याने अमृतहल्ली जवळ पम्पा एक्सटेंशन परिसरात सीईओ आणि एमडींची हत्या केली. एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सीईओ विनू कुमार होते तर एमडी फणींद्र सुब्रमण्यम हे होते. इंटरनेट ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते. फेलिक्सने त्याचे दोन सहकारी विनय रेड्डी आणि संतोष उर्फ संतू यांच्या मदतीने दोघांची हत्या केली. पोलिसांनी तिघांना कार्यालयातच पकडलं. त्यांनी कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसमोरच फेलिक्सने एमडी सुब्रमण्यम यांच्यावर वार करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना वाचवायला सीईओ विनू कुमार धावले तेव्हा त्यांच्यावरही वार केले. Palghar News : वाईट घडलं, बंधारा पाण्याखाली, रस्तेही बंद; 2 महिन्याच्या चिमुकलीने हातातच सोडला जीव आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. तिथे उपचारावेळी दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, फेलिक्स आधी याच कंपनीत काम करत होता. त्याचा सुब्रमण्यम आणि विनू कुमार यांच्याशी वाद होता. त्यातूनच हा प्रकार घडला. नोकरी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरू केली होती. कंपन्यांच्या स्पर्धेतून त्यांचा वाद जास्तच वाढला होता. खून करण्याआधी आरोपी फेलिक्सने व्हॉटसअप स्टेटस ठेवलं होतं. त्यात त्याने लोक धोकेबाज असतात असं म्हटलं होतं. त्यामुळे मी या ग्रहावरील लोकांना इजा पोहोचवली. मी कधीच चांगल्या लोकांना त्रास दिला नाही. फक्त वाईट लोकांनाच इजा पोहोचवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात