वरातीत अंदाधुंद गोळीबार, नवऱ्या मुलाच्या भावाचा झाला मृत्यू

लग्नाच्या वरातीत करण्यात आलेल्या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बिहारमधली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:19 PM IST

वरातीत अंदाधुंद गोळीबार, नवऱ्या मुलाच्या भावाचा झाला मृत्यू

पाटणा, 26 ऑगस्ट : हल्ली लग्नाच्या वरातीत हवेत गोळीबार करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पण या ट्रेंडपायी कित्येक जणांचा नाहक बळी गेला आहे. अशाच एका लग्नाच्या वरातीत करण्यात आलेल्या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बिहारमधली आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार कठोर सूचना केलेल्या असतानाही येथील हवेत गोळीबार करण्याचे प्रकार थांबवण्याचे नाव घेत नाहीयत. विवाहसोहळ्यात दिवसाढवळ्या उघडपणे डीजेच्या तालावर गोळीबार केला जातो. रविवारी (25 ऑगस्ट) देखील येथे अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये नवऱ्या मुलाच्या भावाचाच मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर संतप्त जमावानं आरोपी तरुणाला बेदम मारहाण केली. सुदैवानं पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले म्हणून नाहीतर या आरोपी तरुणाची जमावानं हत्याच (Mob Lynching) केली असती.

(वाचा : कर्जबाजारी पाकिस्तानकडे चहा-बिस्किट खायला पैसे नाहीत, पंतप्रधानांनी घेतला 'हा' निर्णय!)

त्याच्या डोक्यालाच लागली गोळी

मसूरचक गावातील रहिवासी मोहम्मद अकबर यांच्या मुलीचा निकाह खगडिया जिल्ह्यातील फुलतौरा गावातील सरफराजसोबत ठरवण्यात आला. रविवारी दुपारच्या सुमारास वरात खगड़ियाहून बेगुसराय येथे पोहोचली. वरात ज्या क्षण तेथे पोहोचली तेव्हाच वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचत असताना एकानं हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. यामध्ये नवऱ्या मुलाचा भाऊ मोहम्मद सद्दामच्या डोक्यालाच गोळी लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

(वाचा : धावपटू कविता राऊत राजकारणाच्या मैदानात, 'या' पक्षाकडून लढून थेट माजी मंत्र्याच्या मुलीला देणार आव्हान?)

Loading...

घटनास्थळी सापडली काडतुसं

गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान त्यांना काडतुसं सापडली. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या मोहम्मद जहांगीरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

(वाचा : सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये महिलेची छेड... नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक)

निकाह रोखला

सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्यानं नवऱ्यामुलानं आपला निकाह थांबवला. संपूर्ण कुटुंबीयांना या घटनेमुळे जबरदस्त धक्का बसला आहे.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...