Home /News /crime /

ख्रिसमसपूर्वी सांताक्लॉजने ड्रग डिलरला दिलं Surprise गिफ्ट; पोलिसांनी असा रचला सापळा, पाहा VIDEO

ख्रिसमसपूर्वी सांताक्लॉजने ड्रग डिलरला दिलं Surprise गिफ्ट; पोलिसांनी असा रचला सापळा, पाहा VIDEO

Video मध्ये पाहा Undercover सांताक्लॉज...

    पेरु, 19 डिसेंबर : ड्रग डिलरने (Drug Dealer) कधी स्वप्नातही विचार केला नसेल की सांताक्लॉज बनून पोलीस त्याचा भांडाफोड करतील. दक्षिण अमेरिका खंडातील पेरूच्या देशात ही हैराण करणारी बाब समोर आली आहे. येथे अंडर-कव्हर पोलीस अधिकाऱ्यांनी ख्रिसमसच्या ठीक आधी सांताक्लॉजसारखे कपडे घातले आणि कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्सच्या ड्रग विक्रेत्याला रंगेहात पकडले. सांताक्लॉज बनून पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे ही पक्षपाती कारवाई केली, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पेरूच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छापेमारीची कारवाई करणाऱ्या अधिकारी एन्टी ड्रग्ज स्क्वॉडचा एक भाग आहेत. यापैकी काही अधिकाऱ्यांनी सांताक्लॉजचे कपडे परिधान करून कारवाई केली. विशेष म्हणजे, ब्रिटीश संस्कृतीत ख्रिसमस एल्फ एक असा प्राणी असतो, जो  सांताक्लॉज बरोबर उत्तर ध्रुवावर राहतो आणि सांताला मदत करतो. तर एका अधिकाऱ्यानेही एल्फचा ड्रेस घातला होता. अचानक सांताक्लॉजने केली कारवाई सांताक्लॉज बनलेल्या पोलिसांनी सुरुवातीला ड्रग्ज विक्रेत्याच्या घराचा दरवाजा तोडला आणि अचानक घरात घुसले. त्यानंतर त्याला ओलिस ठेवून घरात ठेवलेली लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती शाळेबाहेर ड्रग्सची विक्री करताना दिसला होता. यावेळी त्याचा व्हिडीओ करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे पेरू पोलीस वेश बदलून गनिमी कारवाई करण्यासाठी प्रसिध्द आहे. यापूर्वीही बर्‍याच वेळा पोलीस एजंटनी त्यांचा वेष बदलला आणि गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले. कधीकधी येथील पोलीस अधिकारी भिकारी बनूनही कारवाई करतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या