मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

खळबळजनक ! पैशांसाठी जन्मदात्या पित्याची हत्या, निनावी फोन कॉलमुळे फुटलं बिंग

खळबळजनक ! पैशांसाठी जन्मदात्या पित्याची हत्या, निनावी फोन कॉलमुळे फुटलं बिंग

आपल्या जन्मदात्या वडिलांचीच मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आपल्या जन्मदात्या वडिलांचीच मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आपल्या जन्मदात्या वडिलांचीच मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बीड, 25 ऑगस्ट : आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या (Murder) करुन पुरावा नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेर (Parner Patoda) येथे हा प्रकार घडला आहे. मात्र, एका निनावी फोन कॉलमुळे (Anonymous Phone Call) आरोपीचं बिंग फुटलं.

बँकेच्या पैशाच्या देवाण (Money transaction) घेवाणीवरून जन्मदात्या पित्याचा मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरावा नष्ट करण्यातसाठी चुलत भावाच्या मदतीने अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पाच आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पाटोदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अश्लील VIDEO व्हायरल होताच BJP नेत्याचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे व्यसनी मुलाने बँकेच्या पैशाच्या देवाण - घेवाणीवरुन बापाला मारल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी योगेश महादेव औटे याच्या मारहाणीत महादेव औटे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भाऊ गणेश महादेव औटे, विष्णू बलभिम औटे, वाल्मिकी बलभिम औटे, परमेश्वर बलभिम औटे यांनी संगणमत करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन पुरावा नष्ट केला.

पोलीस स्टेशनला एक निनावी फोन आला आणि त्याद्वारे या घटनेला वाचा फुटली. जन्मदात्या पित्याला मारणाऱ्या मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र. 159/21 भादवी 302,201 , 34 अ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

First published:

Tags: Beed, Crime