मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Beed Crime : भावकीचा वाद, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवले दोन सख्ख्या भावांना, आरोपी चुलत भाऊ फरार

Beed Crime : भावकीचा वाद, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवले दोन सख्ख्या भावांना, आरोपी चुलत भाऊ फरार

Beed Murder news परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण दोघांवरही धारदार कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात या दोघांपैकी एका भावाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यानं उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला.

  • Published by:  News18 Desk

बीड, 18 मे : बीडच्या (Beed News) नागापूर खुर्दमध्ये भावकीच्या जुन्या भांडणातुन चुलत भावाने दोन सख्या (Cousin Murdered two brothers) भावांची हत्या केली. कुऱ्हाडीचे वार करून अत्यंत निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं गावात या घटेनंनं खळबळ माजली आहे. या प्रकारानंतर आरोपी फरार झालेला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत.

बीड शहराच्या जवळच असलेल्या नागापूर खूर्दमध्ये राम सोळंके आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे भाऊ राहत होते. या दोघांचे त्यांचा चुलत भाऊ असलेल्या परमेश्वर सोळंके याच्याशी सुमारे 15-20 दिवसांपूर्वी काही वादातून भांडण झाले होते. या वादातून एकमेकांना शिविगाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. पण गावातील इतरांनी या प्रकरणी मध्यस्थी करत या सर्वांची समजूत काढली. त्यामुळं हा वाद त्यावेळी मिटला होता.

(वाचा-नाशिक: चौकार की षटकार? उत्तर देणं पादचाऱ्याला पडलं महागात; बेदम मारहाण)

वाद मिटला असला तरी दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण यांना शिविगाळ केली होती. तसंच पुन्हा एकदा फोनवर त्याने या दोन भावांना शिविगाळ केली. त्यानंतर त्याला समजावण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी म्हणून राम आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे पुन्हा त्याच्याकडे गेले होते. मात्र परमेशवरचा पारा हा चांगलाच चढलेला होता. त्यावेळी भांडण विकोपाला पोहोचलं आणि परमेश्वर याने दोघांवर हल्ला केला.

(वाचा-Parali Crime : डॉक्टर जावयानं केलेला अपमान जिव्हारी; सासूनं उचललं टोकाचं पाऊल)

परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण दोघांवरही धारदार कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात या दोघांपैकी एका भावाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यानं उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला. या प्रकारानंतर परमेश्वर हा फरार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी परमेश्वर सोळंकेच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आल्याचं पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सांगितलं. छोट्याशा भांडणामुळे वाद वाढून तो एवढा विकोपाला गेल्यानं, दोघांना जीव गमवावा लागला. त्यामुळं या प्रकाराविषयी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Beed news, Crime news, Maharashtra News, Murder