मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार अडचणीत; भाजप नेत्यावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार अडचणीत; भाजप नेत्यावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार अडचणीत

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार अडचणीत

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर भाजप नेते अशोक शेजुळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 8 मार्च : माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे अडचणीत आले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या संस्थांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते अशोक शेजुळ यांच्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ला प्रकरणी आता आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगला सोळुंके, व्यापारी रामेश्वर टवानी व इतर चार ते पाच जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने आता त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.

अशोक शेजुळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा - कोल्हापुरात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवली

काय आहे प्रकरण?

भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर माजलगाव शहरातील शाहूनगर येथे ते दुचाकीवरुन जात असताना मोटरसायकलवरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर रॉडच्या व धारधार शस्त्राच्या साह्याने हल्ला चढवला. यामध्ये त्यांच्या हातापायावर जबर मार लागला असून एक पाय मोडला आहे. त्यांच्या डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांनीच घडवून आणल्याचा आरोप अशोक शेजुळ यांनी केला. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखलदेखील केली.

दरम्यान, सोळंके यांच्यासह पत्नी व इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगला सोळंके, व्यापारी रामेश्वर टवानी व इतर चार ते पाच जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, NCP