मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अभ्यासावरुन बापाने 3 रीच्या मुलाला दिली भयंकर शिक्षा; पोलिसांसमोर कान पकडून उठाबशा काढायची आली वेळ

अभ्यासावरुन बापाने 3 रीच्या मुलाला दिली भयंकर शिक्षा; पोलिसांसमोर कान पकडून उठाबशा काढायची आली वेळ

लहानपणी मिळालेल्या वागणुकीचा त्यांच्या भविष्यावर खूप परिणाम होतो, हे पालकांनीही समजून घ्यायला हवं

लहानपणी मिळालेल्या वागणुकीचा त्यांच्या भविष्यावर खूप परिणाम होतो, हे पालकांनीही समजून घ्यायला हवं

लहानपणी मिळालेल्या वागणुकीचा त्यांच्या भविष्यावर खूप परिणाम होतो, हे पालकांनीही समजून घ्यायला हवं

दुर्गापूर, 18 जानेवारी : आई-वडील मुलांचं संरक्षण करतात आणि त्यांच्या भल्याचाच विचार करतात. मात्र अनेकदा शिक्षक मुलांसोबत वाईट वागणूक देणं किंवा त्यांच्यासोबत अमानवीय पद्धतीने वागत असल्याच्या बातम्या समोर येतात. ( father gave the 3rd std son a terrible punishment ) अशात जर वडील मुलांसोबत क्रुरपणे वागू लागले तर मुलाने कुठं जायचं. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथून आली आहे.

येथे एका वडिलांनी आपल्या मुलाला अशी शिक्षा दिली की लोकांनी राग व्यक्त केला. येथे शनिवारी एका वडिलांनी अभ्यासाच्या कारणावरुन एक ह्रदयद्रावक शिक्षा दिली. अभ्यास केला नाही म्हणून या वडिलांनी मुलाच्या गालावर गरम तवा लागवा आणि कान इतक्या जोरात ओढला की कानात सूज आली. स्थानिकांनी याबाबत सांगितलं की, मुलाने खोडकरपणा केला तर त्याचे आई-वडील त्याला अशा प्रकारची क्रुर शिक्षा देतात.

हे ही वाचा-VIDEO : निवडणुकीचा संघर्ष रस्त्यांवर; भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या रॅलीवर दगडफेक

शेजारच्यांनाही हे पाहवत नाही. पांडवेश्वरमधील खोट्टाडिह कोलियरीच्या ईसीएल कर्मचारी अशोक तिवारी यांना जेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या चौकशीतून वाचण्यासाठी ठाण्यात कानाला पकडून उठाबशा काढल्या. आणि शेजाऱ्यांचीही माफी मागितली. याशिवाय भविष्यात असं करणार नसल्याचंही सांगितलं. शेजारच्यांनी सांगितलं की, दुसरी व तिसरीत शिकणारी ही मुलं खूप घाबरली आहेत. ( father gave the 3rd std son a terrible punishment ) गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. शनिवारी याचा अतिरेक झाला व पोलिसांना पाचारण करावे लागले.

First published:

Tags: Crime news, School children