मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

इन्स्टाग्राम फोटो पोस्ट करणं एका ब्युटी इन्फ्लुएन्सरला पडलं महागात; होऊ शकते 6 वर्षांची कैद

इन्स्टाग्राम फोटो पोस्ट करणं एका ब्युटी इन्फ्लुएन्सरला पडलं महागात; होऊ शकते 6 वर्षांची कैद

रशियन ब्युटी इन्फ्लुएन्सर वेरोनिका

रशियन ब्युटी इन्फ्लुएन्सर वेरोनिका

इन्स्टाग्रामवरून लोकांना इन्फ्लुएन्स केल्यामुळे तुम्हाला 6 वर्षांची कैदही होऊ शकते. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. असंच काहीसं घडलंय रशियात राहणार्‍या एका ब्युटी इन्फ्लुएन्सरसोबत.

सध्याच्या जगात अनेकजण सोशल मीडियावर(Social Media) व्यक्त होत असतात. पण व्यक्तिस्वातंत्र्याचे नियम देशपरत्वे बदलतात. याच सोशल मीडियावर आक्षेपार्ह कंटेट प्रदर्शित करणं अंगाशी आल्याच्या घटना आपण वाचतोच. पण इन्स्टाग्रामवरून लोकांना इन्फ्लुएन्स केल्यामुळे तुम्हाला 6 वर्षांची कैदही होऊ शकते. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. असंच काहीसं घडलंय रशियात राहणार्‍या एका ब्युटी इन्फ्लुएन्सरसोबत. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक रशियातल्या एका ब्युटी इन्फ्लुएन्सरच्या (Social Media Influencer) अंगाशी आलाय. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या कंटेटमुळे सरकारी अधिकारी थेट तिच्या घरी पोहोचले. या सरकारी अधिकर्‍यांनी तिला या कृत्याबद्दल 6 वर्षांची कैद होऊ शकते अशी समज दिली. परंतु, तरीही आपण इन्स्टाग्रामचा वापर करत राहणार असं या ब्युटी इन्फ्लुएन्सरने म्हटलंय. ही घटना रशियात घडली आहे. 18 वर्षीय व्हेरोनिका लॉगिनोवावर दहशतवादी असल्याचा आरोप केला गेलाय. खरं तर, व्हेरोनिका ही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ब्युटी आणि फॅशनबद्दल माहिती देण्याचं काम करते. पण व्हेरोनिकाचं असं म्हणण आहे की, सरकारी अधिकार्‍यांचा असा आरोप आहे की तिच्या अकाउंटवरून शेअर होणारा कंटेंट (Social Media Content) हे इतरांच्या तुलनेत वेगळा आणि आक्षेपार्ह आहे. इन्स्टाग्रामवर व्हेरोनिकाचे एकूण 5,84,000 फॉलोअर्स आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये या मुद्द्याला अनुसरून म्हटलंय, ‘रशियात हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं.” तिने पुढे म्हटलंय, ‘‘ प्रॉसिक्युटर्स अर्थात सरकारी अधिकारी कधीही तुमच्या घरी येऊ शकतात. मी नेहमीच पॉलिटिक्सपासून दूर राहते. पण इन्स्टाग्राम अकाउंट चालवण्यामुळे मला 6 वर्षांची कैद होण्याची शक्यता आहे.’’ व्हेरोनिकावर दहशतवादी असण्याचा आरोप झालाय. कारण तिने केलेल्या पोस्ट्समुळे अनेकजण फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल साईटस वापरण्याकडे आकर्षित होऊ शकतात. व्हेरोनिकाने तरीही सोशल मीडिया वापरणं थांबवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. उलट ती सोशल मीडियाशी निगडित नव्या कायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणार आहे. तसंच या नव्या कायद्याचा रशियन जनतेला किती त्रास होऊ शकतो याविषयी माहिती देणार आहे. हेही वाचा - आता पासपोर्ट काढण्याची कटकट विसरून जा; सोपी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या व्हेरोनिकाने पुढे म्हटलंय की, “मी नशीबवान आहे की मला अशा लोकांचा सपोर्ट आहे की, ज्यांच्यामते सोशल मीडियावर पोस्ट करणं हे अगदी नॉर्मल आहे. तसंच माझ्यासोबत जे घडलंय ते मला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे.” मार्च 2022 मध्ये पाश्चात्य सोशल मीडियाविरोधातल्या मोहिमेनुसार रशियाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बंदी आणली (Russian Laws) आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेन्ट कंपनी असलेल्या मेटा कंपनीवर दहशतवादी असल्याचा आरोप लावला होता. रशियन सैनिकांविरोधात होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट्सवर मेटा कंपनीकडून कुठलंही बंधन घालतं गेलं नाही त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर रशियात बंदी घालण्यात आली. पण रशियाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बंदी आणल्यावर एका देशी सोशल मीडियाची निर्मिती केली. ज्याचे नाव रॉसग्राम आहे. इतकंच नाही तर रिपोर्टच्यानुसार असं म्हटलंय, की रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांचे काही आप्तेष्ट, कुटुंबीय अजूनही इन्स्टाग्राम वापरतात. व्हीपीएनच्या माध्यमातून रशियन लोकं आजही इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकतात.
First published:

Tags: Crime, Lifestyle

पुढील बातम्या