Home /News /crime /

गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर घेताना सावधान! पुण्यातील ग्राहकाला बसला मोठा भुर्दंड

गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर घेताना सावधान! पुण्यातील ग्राहकाला बसला मोठा भुर्दंड

पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीला गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर घेणं चांगलच महागात पडलं आहे.

    पिंपरी-चिंचवड, 3 ऑगस्ट : इंटरनेटमुळे सगळं जग कसं एका मुठीत सामावलं आहे. तुम्हाला हवी ती गोष्ट एका क्लिकवर तुम्ही घरबसल्या मागवू शकता. अगदी सेफ्टी पिन ते सॅटेलाईट डिश. तंत्रज्ञानामुळे गोष्टी सहज साध्य झाल्या असल्या तरी यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहेत. आपण वस्तू दुरुस्तीसाठी कस्टमर केअरला फोन लावतो. मात्र, बऱ्याचदा आपल्याकडे असे नंबर नसतील तर आपण लगेच गुगलवर सर्च मारतो. तुम्हीही असेच करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, अशाच एका प्रकरणात पिंपरी चिंचवड शहरातील एका कुटुंबाला चांगला भुर्दंड पडला आहे. काय आहे प्रकरण? पिंपरी-चिंचवडमध्ये गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर घेणं आणि रेफ्रिजरेटरची दुरुस्ती करून घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहक अरुण डुंबरे यांचा रेफ्रिजरेटर बिघडला होता, त्यांनी गुगल वरून कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि लावला. रेफ्रिजरेटर बिघडला असल्याची माहिती दिली. समोरील व्यक्तीने देखील अधिकृत रेफ्रिजरेटरचा कस्टमर केअर असल्याचं भासवलं. घरी येऊन रेफ्रिजरेटर जुजबी दुरुस्त करून दिला. त्यांच्याकडून 3 हजार 200 रुपय घेतले आणि तिथून पसार झाला. मात्र, रेफ्रिजरेटर नादुरूस्त असल्याचं लक्षात आल्यानंतर आणि पुन्हा फोन केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं डुंबरे यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मुंबई : न्यूड व्हिडीओ कॉल, वृद्धाला फसवून 3 लाख बळकावले; शेजारीही तोच प्रकार! अशी घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून काय कराल? आपणही गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर घेत असाल तर आता सावध राहा. फसवणूक टाळण्यासाठी आपल्याकडे कस्टमर केअरचा नंबर मिळवण्याचे इतरही पर्यात आहेत. ते आपण वापरू शकतो. प्रत्येक वस्तूच्या ब्रँडींग किंवा बिलावर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर लिहलेला असतो. तुमच्याकडे वस्तूची पॅकींग किंवा बिल नसेल तर लगेच गुगलर थेट शोधू नका. यासाठी आणखी एक पर्याय आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला त्यांचा कस्टमर केअर, ईमेल आयडी आणि अगदी पत्र पाठवण्याचा पत्ताही मिळून जाईल. त्यामुळे आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर इथून पुढे गुगलवर थेट असे नंबर सर्च करू नका.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Crime, Google

    पुढील बातम्या