मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Dating App वापरताय तर सावधान! तुमचे खासगी चॅट, पेमेंट डिटेल्स चुकीच्या हातात

Dating App वापरताय तर सावधान! तुमचे खासगी चॅट, पेमेंट डिटेल्स चुकीच्या हातात

या रिसचर्सच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, ई- मेल्स आणि पासवर्ड हॅक होणे तितके घातक नाही जितके घातक कोणत्याही प्रकारचा डेटा हॅक होणे आहे.

या रिसचर्सच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, ई- मेल्स आणि पासवर्ड हॅक होणे तितके घातक नाही जितके घातक कोणत्याही प्रकारचा डेटा हॅक होणे आहे.

या रिसचर्सच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, ई- मेल्स आणि पासवर्ड हॅक होणे तितके घातक नाही जितके घातक कोणत्याही प्रकारचा डेटा हॅक होणे आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 6 नोव्हेंबर : आजकाल मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे ऑनलाईन डेटा देखील मोठ्या प्रमणात चोरी होत आहे. परंतु या गोष्टी सध्या सर्वसाधारण झाल्या आहेत. परंतु सध्या हे वारंवार होत असलं तरी एखाद्या डेटिंग अॅपवरील डेटा चोरीला जाणे साधारण गोष्ट नाही. या वर्षी मे महिन्यात दोन सिक्युरिटी रिसर्चसना ओपन इंटरनेट स्कॅनिंग दरम्यान अमेजॉन वेब सर्विसेजच्या बकेटमध्ये अशाच प्रकारचा काही डेटा आढळून आला.

यामध्ये विशेष पद्धतीच्या स्पेशलाइज्ड डेटिंग वेबसाइट्सचा डेटा आढळून आला आहे. या दोन रिसचर्सना एकूण  845 गिगाबाइट्स डेटा आणि जवळपास  25 लाख रेकॉर्ड्स  मिळाले आहेत. यामध्ये हजारो व्यक्तींची माहिती आणि त्यांच्या चॅट्सचे स्क्रिनशॉटदेखील आढळून आले आहेत.

डेटिंग अपवरील सेन्सिटिव्ह माहिती

या दोन्ही रिसर्चसने केलेल्या दाव्यानुसार ही माहिती खूप सेन्सिटिव्ह असून यामधील कन्टेन्ट हा सेन्सिटिव्ह आणि सेक्शुअल आहे. यामध्ये या डेटिंग अपवरील खासगी चॅट, त्यांचे स्क्रिनशॉट आणि पेमेंट डिटेल्स मिळाले आहेत. हॅकर्स काही क्षणात या महत्त्वाच्या माहितीवर डल्ला मारू शकतात. यामध्ये युजर्सची ओळख देखील काढली जाऊ शकते. या रिसर्चसनी हा डेटा हॅक केला नसून या डेट्याच्या सुरक्षेविषयी प्रश्न उभे केले आहेत. हा सर्व डेटा एकाच सोर्समधील असून याचे इन्फ्रास्ट्रक्चर देखील सारखेच आहे. त्यामुळे हा डेटा एकाच वेबसाईटचा किंवा अपचा असू शकतो. गुगल प्ले स्टोअरवर Cheng Du New Tech Zone नावाच्या डेव्हलपरच्या नावाने हे लेआऊट आहे.

हे ही वाचा-BREAKING: हवेत फायरिंग करत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं फिल्मी स्टाईल अपहरण

घातक ठरू शकतो हा डेटा

दुसऱ्या कुणाच्या हातामध्ये हा डेटा सापडला आहे की नाही यासंदर्भात त्यांना अधिक माहिती नाही. या रिसचर्सच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, ई- मेल्स आणि पासवर्ड हॅक होणे तितके घातक नाही जितके घातक कोणत्याही प्रकारचा डेटा हॅक होणे आहे. या डेट्याचा वापर करून कुणालाही मानसिक त्रास आणि जबरदस्ती वसुली करण्यासाठी तसेच या डाटाच्या वापरातून विविध प्रकारचे गुन्हे देखील घडवले जाऊ शकतात.

त्यामुळे अशा प्रकारचा धोका ओळखून AWS बरोबरच इतर क्लाउड प्रोवायडर्सनी विशिष्ट प्रकारचे मॅकेनिजम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामधून युजर्सला तात्काळ धोक्याचा इशारा मिळेल. सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये सतत यावर काम केले जात आहे. या पद्धतीने डेटा चोरी होणे ही अमेझनची समस्या नसून ज्या कंपनीने हे अप तयार केलं आहे यांची त्रुटी असल्याचे या रिसचर्सनी म्हटले आहे.

First published: