सावधान! तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर आधी ‘हे’ वाचा

सावधान! तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर आधी ‘हे’ वाचा

अनेक लहान मुलांसाठी लॉलीपॉप (Lollipop) आणि कँडी (Candy) म्हणजे जीव की प्राण असतो. तुमच्या मुलांना याची आवड किंवा सवय असेल तर आता सावध होण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी:  अनेक लहान मुलांसाठी लॉलीपॉप (Lollipop) आणि कँडी (Candy) म्हणजे जीव की प्राण असतो. काही मुलं तर दिवसभर याचे विविध प्रकार खात असतात. तुमच्या मुलांना याची आवड किंवा सवय असेल तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. कारण, यामध्ये टॅल्कम पावडर (Talcum Powder) मिसळण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

काय आहे प्रकरण?

खाद्य आणि औषध विभागानं (Food and Drug administration) मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore) पाल्दा परिसरातील केएस इंडस्ट्रीच्या कारखान्यांवर धाड टाकली होती. यानंतर मुलांच्या आवडत्या लॉलीपॉप आणि कँडीमध्ये टेल्कम पावडर मिसळली जात असल्याचं उघड झालं. या कारखान्यातून 4 हजार 200 किलो लॉलीपॉप आणि 5 हजार 600 किलो कँडी जप्त करण्यात आली आहे.

इंदूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अभय बेडेकेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या कारवाईच्या दरम्यान एका पोत्यामध्ये पांढरी पावडर भरलेली आढली. त्यानंतर केलेल्या तपासात ही पांढरी पावडर म्हणजे टॅल्कम पावडर असल्याचं निष्पन्न झालं. ही लॉलीपॉप आणि कँडीमध्ये मिसळली जात होती. लॉलीपॉप आणि कँडी प्लेटला चिकटू नये म्हणून त्यामध्ये टेल्कम पावडर मिसळली जात होती. हा प्रकार लक्षात येताच खाद्य आणि सुरक्षा अधिनियमाच्या अंतर्गत कारखाना मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

(हे वाचा- COVID-19 Vaccine: सध्या बाजारात नाही मिळणार कोरोना लस, NITI आयोगाचं स्पष्टीकरण)

'या कारखान्यानं नियमांचं उल्लंघन केलं आहे. या ठिकाणी अत्यंत गलिच्छ पद्धतीनं कँडी आणि लॉलीपॉपची निर्मिती केली जात होती,' अशी माहिती या कारवाई पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात या कारखान्याचे मालक अनिल अग्रवाल आणि विजय सबनानी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा- महानगरांमध्ये इंधन दरात मुंबई पहिल्या क्रमांकावर! आजही दर 91 रुपये प्रति लीटर पेक्षा जास्त)

इंदूरमधील खाद्य विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून भेसळयुक्त खाद्य पदार्थांची निर्मिती करणारे तसेच बेकायदेशीर कारखान्यांच्या विरोधात मोहीम सुरु आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 4:04 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading