Home /News /crime /

बीकॉमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; या एका गोष्टीमुळे नेहाने जगणंच नाकारलं!

बीकॉमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; या एका गोष्टीमुळे नेहाने जगणंच नाकारलं!

कोरोना काळात (Coronavirus) लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेक जणांनी आत्महत्येसारखं भयावह पाऊल उचलल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे.

    भोपाल, 9 डिसेंबर : कोरोना काळात (Coronavirus) लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेक जणांनी आत्महत्येसारखं भयावह पाऊल उचलल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. या काळाज मानसिक (Mental Health) आजाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. एरवी आपलं सुख-दु:ख शेअर करण्यासाठी आजूबाजूला माणसं होती, मात्र लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम वाढलं आणि शेअरिंगही कमी झालं. दरम्यान अजूनही आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण कमी झालेलं नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील (Bhopal News) जहांगीराबादच्या स्टेट बँक कॉलनीत राहणारी 21 वर्षीय नेहा दिवाकर हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची बातमी समोर आली आहे. तिच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणात तिच्या कुटुंबांचीही चौकशी केली जात आहे. जहांगीराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नेहा दिवाकर बीकॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील मिठाईच्या दुकानात काम करतात. आईदेखील लोकांच्या घरात कामं करते. मंगळवारच्या रात्री 1 वाजता नेहाने राहत्या घरात गळफास घेतला. तिचा भाऊ संदीपने तिला घरात लटकलेल्या अवस्थेत पाहिलं, आणि आरडाओरडा सुरू केला. हे ही वाचा-फोटो काढला म्हणून तरुणीची हत्या, ड्रग्जच्या नशेत गुन्हेगारांनी केलं तरुणीचं दफन यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तिला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी घराच्या तपासात एक सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये नेहाला पायांचा आजार असल्याचं लिहिलं आहे. पायाला होत असलेल्या त्रासामुळे नेहा त्रस्त झाली होती, यातूनच नेहाने आत्महत्येसारखं पाऊल उचरलल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bhopal News, Crime, Students, Suicide

    पुढील बातम्या