धक्कादायक! वेगळं राहण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

धक्कादायक! वेगळं राहण्यावरून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

कौटुंबिक वादातून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, बारामती हादरलं

  • Share this:

बारामती, 15 ऑगस्ट : दोन भावांमधील झालेल्या वादानं बारामती हादरली आहे. वेगळं राहण्यावरून झालेल्या वादावरून सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाकट्या भावानं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलत मोठ्या भावाचा विश्वासघात केला आहे.

काळखैरेवाडीतील एका गावात भयंकर प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून दोन भावांमध्ये वेगळं राहण्यावरून वाद धुमसत होता. संतापाच्या भरात मोठ्या भावानं तू वेगळं राहा असं धाकट्या भावाला सांगितलं. चिडलेल्या लहान भावानं दादाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. यामध्ये मोठा भाऊ गंभीररित्या जखमी झाला. रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा-बापानं आपल्याच मुलाच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री मारुती भोंडवे याने धाकट्या भावाला ‘तू वेगळा रहा’, असे सांगितले होते. याचा राग आल्याने अनिलने मोठा भाऊ मारुतीच्या घराला कडी लावून खिडकीतून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. दरम्यान, मारुती भोंडवे यांच्या अंगावरील आग विझवण्यासाठी त्यांची पत्नी पुढे आली असता त्याही आगीत होरपळून जखमी झाल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारुती वसंत भोंडवे (वय 48) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेली पत्नीही भाजल्यानं सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारुती भोंडवे यांनी मृत्यूआधी फिर्याद दिली असून त्यावरून धाकटा भाऊ अनिल भोंडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 15, 2020, 8:11 AM IST

ताज्या बातम्या