बँक ऑफिसर पतीने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; मग मेलेल्या सापाचे दात रुतवून रचला बनाव

बँक ऑफिसर पतीने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; मग मेलेल्या सापाचे दात रुतवून रचला बनाव

बँकेत अधिकारीपदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने गर्लफ्रेंडबरोबर राहता यायला हवं, म्हणून पत्नीचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं एक भयंकर कट रचला.

  • Share this:

इंदौर (मध्य प्रदेश)6 डिसेंबर : बँकेत अधिकारीपदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने गर्लफ्रेंडबरोबर राहता यायला हवं, म्हणून पत्नीचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं एक भयंकर कट रचला, त्यासाठी राजस्थानातून पाच हजार रुपयांना कोब्रा अर्थात विषारी नाग विकत आणून घरात ठेवला. पत्नीची हत्या करून तिला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या या पतीला पोलिसांनी बरोबर सत्य वदवायला लावलं. मध्य प्रदेशातल्या इंदूरची ही खळबळजनक कहाणी आहे.

इंदूरच्या संचार नगर एक्स्टेंन्शनमध्ये राहणाऱ्या शिवानी पटेरिया यांच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उलगडलं. त्यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी पती अमितेष पटेरिया यांना अटक केली आहे. अमितेष एका बँकेत अधिकारीपदावर काम करतो. आपल्या प्रेयसीबरोबर राहण्याचा मार्ग मोकळा मिळावा यासाठी त्यानं बायकोचा काटा दूर करायचं ठरवलं. त्यासाठी अमितेषने महिनाभर आधीच या हत्येचा कट शिजवला.

राजस्थानात अल्वरला जाऊन आधी त्यानं एक विषारी साप - कोब्रा आणला. पाच हजार रुपये खर्चून आणलेला हा नाग या इसमान तब्बल 11 दिवस कपाटात ठेवला. एक दिवस ठरवून पत्नी सोडता घरातल्या सर्वांना बाहेर पाठवलं.

वाचा - लग्नात डान्सर तरुणीवर झाडली गोळी, घटनेचा VIDEO मोबाईलमध्ये कैद

वडील आणि मुलं बाहेर गेल्यानंतर झोपलेल्या पत्नीच्या नाका-तोंडावर उशी दाबून क्रूरपणे तिला संपवलं. त्यानंतर सर्पदंश झाल्याचा बनाव रचला. त्यासाठी कपाटात ठेवलेल्या नागाचे दात मृत पत्नीच्या शरीरात घुसवले. हा अमानुष खुनाचा कट ठरल्याप्रमाणे पार पडल्यानंतर डॉक्टरांकडे आणि पोलीस स्टेशनला कळवलं. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत अमितेषवर संशय आला. अमितेषला ताब्यात घेतल्यावर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.

वाचा - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

अमितेश पटेरियाचं पत्नी शिवानीशी गेली 7 वर्षं पटत नव्हतं. दिल्लीत राहणाऱ्या एका बँकेत काम करणाऱ्या तरुणीशी त्याचं अफेअर होतं. तिच्याबरोबर संसार करण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून अमितेषने पत्नी शिवानीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक नामी कट रचना, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला.

-------------------------------

अन्य बातम्या

भाजप विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षाकडे सापडले गावठी पिस्तूल

लव्ह, सेक्स आणि धोका, अखेर तरुणाला आणले ICUमध्ये आणि लावले लग्न!

ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात! एका क्लिकमुळे बसला 95,000चा फटका

हैदराबाद एन्काऊंटर.. नगरमध्ये जल्लोष, कोपर्डीतील 'त्या' नराधमांना फाशी कधी?

हैदराबाद प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच पोलिसांनी केला एन्काऊंटरचा प्लान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या