• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • बँक ऑफ बडोदाच्या महिला ब्रांच मॅनेजरचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

बँक ऑफ बडोदाच्या महिला ब्रांच मॅनेजरचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

महिला व तिचा पती बँकेत चांगल्या पदावर नोकरी करीत होते.

 • Share this:
  झज्जर, 12 सप्टेंबर : हरयाणामधील (Haryana) बहादुरगडमधील बँक ऑफ बडोदाच्या सीनिअर मॅनेजरचा मृतदेह (Dead Body) तिच्या पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही महिला रांची येथे काम करीत होती. तर तिचा पती झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावातील हरियाणा बँकेत काम करतो. बहादुरगडमधील सेक्टर 6 पोलीस ठाणे हद्दीत मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारावर तिच्या पतीविरोधात हत्येचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bank of Barodas female branch managers dead body found hanging) मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांचीतील एचआसी कॉलनीत राहणाऱ्या शिल्पी सोनम या अपना बाजार येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते. तर त्यांचा पती हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावात हरयाणा ग्रामीण बँकेत काम करतो. शिल्पी सोनमचे भाऊ दीपक कुमार याने सांगितलं की, तिचा नवरा तिला त्रास देत होता. शिवाय नशेचा ओव्हरडोस घेत असल्याने बहीण सासरी रांची येथे राहत होती. तर राकेश शर्मा बहादुरगडमधील ओमॅक्स सोसायटीच फ्लॅट घेऊन राहतो. हे ही वाचा-घरकामाला बाई ठेवण्यावरुन इंटीरिअर डिजायनर सून भडकली; सर्वांसमोर सासूला मारहाण 4 सप्टेंबर रोजी त्याची बहीण शिल्पी सोनम आपली दोन मुलं आणि राकेशच्या भाच्यांसह बहादुरगड येथे आली होती. येथे आल्यानंतर राकेशने तिला त्रास सुरू केला. यादरम्यान शिल्पी सोनम हिचा मृतदेह तिच्याच पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. राकेशना याबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: