लखनऊ 25 जून : देशभरात कोरोना विषाणूनं (Coronavirus) मागील वर्षाभरापेक्षा अधिक काळापासून थैमान घातलं आहे. या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क (Face Mask) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) या गोष्टींवर अधिक भर दिला जात आहे. मात्र, अनेकजण या परिस्थितीमध्येही विनामास्क फिरताना दिसतात. यासाठी अनेकांना दंडही भरावा लागतो. मात्र, मास्क न घातल्यामुळे एखाद्यावर गोळीबार केला जाऊ शकतो, असा विचार तुम्ही कराल का? मात्र, ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. बरेली येथील बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) स्थानिक कार्यालयात हा प्रकार घडला.
तरुणीनं होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; समोर आलं धक्कादायक कारण
विनामास्क बँकेत आलेल्या एका ग्राहकाला गार्डनं (Security Guard) गोळी मारल्याचं या घटनेत पाहायला मिळालं. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक मास्क न घालता बँकेत आल्यानं गार्ड आणि ग्राहकात वाद सुरू झाला. यानंतर रागात गार्डनं ग्राहकावर गोळी झाडली.
चांगली बातमी: देशातल्या कोरोना लसीकरणासंदर्भातली मोठी अपडेट
बरेली जंक्शनजवळील नॉर्थ रेल्वे कॉलनीतील रहिवासी असलेला राजेश कुमार राठोड (35) टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये हेल्पर आहे. ते शुक्रवारी सकाळी सिव्हिल लाइन्स येथील बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. यानंतर ते विनामास्क कार्यालयात गेले. याच कारणामुळे गार्ड आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर ते पुन्हा बँकेत विनामास्क जात होते, यामुळे सुभाषनगरचे रहिवासी असलेल्या केशव कुमार या गार्डनं याचा विरोध केला. यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर गार्डनं राजेश यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी राजेशच्या पायाला लागली. यानंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गार्ड केशव कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Face Mask