धक्कादायक! आई आणि भावावर चाकूहल्ला करून ती मित्रासोबत पळून गेली अंदमानला

धक्कादायक! आई आणि भावावर चाकूहल्ला करून ती मित्रासोबत पळून गेली अंदमानला

बंगळुरूमध्ये एका 33 वर्षांच्या महिलेने आपल्या आईवर चाकूहल्ला केला, नंतर तिच्या लहान भावावरही हल्ला केला आणि ती तिच्या मित्रासोबत अंदमान निकोबारला पळून गेली.

  • Share this:

बंगळुरू, 6 फेब्रुवारी : बंगळुरूमध्ये एका 33 वर्षांच्या मुलीने आपल्या आईवर चाकूहल्ला केला, नंतर तिच्या लहान भावावरही हल्ला केला आणि ती तिच्या मित्रासोबत अंदमान निकोबारला पळून गेली. अमृता चंद्रशेखर असं या 33 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. तिला अंदमानच्या पोर्ट ब्लेअरमध्ये अटक करण्यात आली. बंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ही आयटी सिटी हादरली आहे.

मित्राने केलं पिकअप

आपली आई आणि भावावर असा प्राणघातक हल्ला करून ती श्रीधर राव या त्याच्या मित्रासोबत पळून गेली. त्याने तिला तिच्या घरूनच बाइकवर पिक अप केलं आणि ते सकाळी 6:30 च्या विमानाने पळून गेले. तिच्या जखमी झालेल्या भावाने नातेवाईकांना फोन केला आणि मदत मागितली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अमृताने तिच्या आईला तिची हैदराबादला बदली झाल्याचं सांगितलं होतं.

भावाची मदत नाकारली

सोमवारी सकाळी अचानक अमृता तिच्या पांघरुणातून घाईघाईत उठली. त्याने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. तिला मदत नकोच होती. उलट तिने भावावरच हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी आई आली तेव्हा अमृताने आईवरही चाकूने हल्ला केला.

(हेही वाचा : महिलेला जिंवत जाळताना पसरली दुर्गंधी, नंतर मारेकऱ्यांनी लटकावले फासावर)

15 लाखांचं कर्ज

आपल्या कुटुंबावर 15 लाख रुपयांचं कर्ज होतं आणि या कर्जामुळे अमृताला ओशाळल्यासारखं वाटायचं, असं तिच्या भावाने सांगितलं. असं असलं तरी या घटनेमागचं नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करतायत.

या खुनाच्या आधी दोन दिवसच अमृता आणि तिच्या मित्राने अंदमानचं तिकीट बुक केलं होतं. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेचच पोर्ट ब्लेअरचं विमान पकडलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना अटक केली.

अमृताने एकटीनेच हा खुनाचा कट रचला की त्यात तिचा मित्रही सामील होता याचा तपास पोलीस करतायत. या घटनेने बंगळुरूच्या रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.

===================================================================================

First published: February 6, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या