Home /News /crime /

Ayesha Suicide Case: तुझ्या डोळ्यांवर मी फिदा होते, का हे पुढच्या जन्मातच सांगेल; आयशाचं शेवटचं पत्र आलं समोर

Ayesha Suicide Case: तुझ्या डोळ्यांवर मी फिदा होते, का हे पुढच्या जन्मातच सांगेल; आयशाचं शेवटचं पत्र आलं समोर

आयशानं लिहिलं (Ayesha Suicide Note) की मी कधीच तुला धोका दिला नाही मात्र तू हसते खेळते दोन जीव घेतले आहेत. आय लव्ह यू कुकू. मी चुकीची नव्हते, तुझा स्वभावच चुकीचा होता.

    अहमदाबाद 07 मार्च : अहमदाबादमधील 23 वर्षीय आयशाच्या आत्महत्येनं (Ayesha Suicide Case) संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच यात अनेक नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. अशात आता आयशाचे वडील आणि तिच्या वकीलांनी न्यायालयासमोर असं पत्र (Ayesha Suicide Note) मांडलं आहे, ज्यात आत्महत्येपूर्वी आयशानं आपल्या पतीचं नाव लिहिलं आहे. आयशानं आपलं सर्व दुःख या कागदावर मोकळं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच साबरमती रिवर फ्रंटवरुन नदीमध्ये उडी घेत आत्महत्या करणाऱ्या आयशाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर देशभरात याची चर्चा सुरू झाली आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आयशाला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आयशाचा पती आरिफला अटक केली आहे. शनिवारी आत्महत्येप्रकरणी आरिफची रिमांड संपल्यानंतर आरिफला हजर केले असता, आयशाच्या वडिलांचे वकील जफर पठाण यांनी आयशाने लिहिलेले पत्र न्यायालयात सादर केले. आयशाने हे पत्र आरिफला लिहिले होते, ज्यात तिनं लिहिलं होतं, की तू आपली चूक लपवण्यासाठी माझं नाव आसिफसोबत जोडलं. आसिफ माझा सर्वात चांगला मित्र आणि चांगला भाऊ आहे. इतकंच नाही तर याच आयशानं आरिफनं तिच्यावर केलेल्या अन्यायाबद्दलही लिहिलं आहे. आयशानं लिहिलं आहे, की तू मला 4 दिवस खोलीत बंद केलं होतं. तू मला जेवण आणि पाणीही दिलं नव्हतं आणि मी तेव्हा गर्भवती होते. तरीही तू माझ्या मदतीसाठी आला नाही आणि जेव्हा आला तेव्हा तू मला खूप मारलं, यामुळे माझ्या लिटल आरू आसिफचा मृत्यू झाला, आता मी त्याच्याकडे चालले आहे. आयशानं पुढं लिहिलं, की मी कधीच तुला धोका दिला नाही मात्र तू हसते खेळते दोन जीव घेतले आहेत. आय लव्ह यू कुकू. मी चुकीची नव्हते, तुझा स्वभावच चुकीचा होता. तुझ्या डोळ्यांवर मी फिदा होते, मात्र का हे पुढच्या जन्मातच सांगेल. यानंतर आयशानं लिहिलं, लव्ह यू, यूअर वाईफ आयशा आरिफ. आयशाचं आपल्या पतीसाठीचं हे भावनिक पत्र मन हेलावणारं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime, India, Shocking news, Suicide

    पुढील बातम्या