भयंकर! प्रेशर पाईपने मित्राने गुप्तांगात भरली हवा; 21 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तरुणाची प्रकृती...

भयंकर! प्रेशर पाईपने मित्राने गुप्तांगात भरली हवा; 21 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तरुणाची प्रकृती...

तरुण कामावर असताना त्याच्या मित्रांनी प्रेशर पाईपने त्याच्या गुप्तांगात हवा भरली. त्यानंतर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला

  • Share this:

हरियाणा, 21 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून हरियाणात एका मागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यापैकी एक घटना सीएम सिटी कर्नाल येथील आहे. येथे एक तरुणाची गेल्या 21 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी ठरली आहे. मात्र हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून याचा पीडित तरुणाच्या कुटुंबीयांवर मोठा परिणाम झाला आहे.

खरं तर मित्राने त्याच्यासोबत अत्यंत लज्जास्पद असा विनोद केला. त्याने चेष्टा करीत असताना मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) हवा  भरली. त्यानेही मित्राची चेष्टा काहीही विरोध न करता सहन केली. यानंतर, त्याच्या आतड्यांना जखम झाली. तेव्हा मात्र क्रुरपणे सुरू असलेल्या चेष्टेची सीमा ओलांडली. त्रास होत असल्याचे पाहून घाईघाईने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, तर या निर्लज्जपणाचा (CCTV) सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

ही घटना 25 नोव्हेंबर रोजी कर्नाल जिल्ह्यातील तरावडीमध्ये घडली आहे. निसिंग भागातील ओंगड या गावात राहणारा मूळ बंगालचा रहिवासी असणारा नजारामुल हक तारावाडी येथील एब्रो इंडिया राईस मिलमध्ये एका कंत्राटदाराखाली मजुरीचे काम करतो. त्यादिवशी तो प्रेशर पाईपने साफ-सफाई करीत होता. तर दुसरीकडे त्याचे सहकारी कपडे स्वच्छ करीत होता. तेव्हा नाजरमुल हकने सोबत काम करणाऱ्या मित्राच्या  गुप्तांगात पाइट टाकून पोटात हवा भरली. ज्यामुळे त्याचं पोट फुगलं आणि तब्येत बिघडली.  त्यानंतर तातडीने त्याला कुरुक्षेत्र येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी सांगितलं की, अधिक हवा भरल्याने त्याच्या आतड्यांना गंभीर जखम झाली आहे. तब्येत अधिक खराब झाल्यानंतर घृणास्पद प्रकार करणारे मित्र घटनास्थळाहून फरार झाले. याबाबत पोलिसांना कळवण्यात आला. यानंतर 15 डिसेंबर रोजी पीडित तब्येत बरी झाल्यानंतर घरी परतला.

आता सोमवारी या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या वक्तव्यानुसार सोबत असणाऱ्या मित्रांच्याविरोधात केस दाखल करुन तपास सुरू केला आहे. तरावडीचे एसएचओ सचिन यांनी सांगितलं की, तरुणाच्या पोटात हवा भरल्यामुळे अंतर्गत स्वरुपात गंभीर जखम झाली होती. दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार आरोपींचा शोध सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 21, 2020, 8:29 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या