Home /News /crime /

भीषण! आईनेच केला पोटच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; खटल्यादरम्यान न्यायाधीशही हादरले!

भीषण! आईनेच केला पोटच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; खटल्यादरम्यान न्यायाधीशही हादरले!

कोर्टाने सांगितलं की, या प्रकरणात आईच्या ममत्वाची भावना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

    कोची, 23 जानेवारी : केरळ उच्च न्यायालयाने कथित रुपात आपल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या महिलेला शुक्रवारी जामीन देण्यात आला. आरोपी आईला पॉक्सो अॅक्टअंतर्गत अटक करण्यात आली होती. आईवर इतके गंभीर आरोप लागल्यानंतर कोर्टाने तपासाचे आदेश दिले आहेत. (mother herself sexually abused the child ) SIT करणार लैंगिक छळ प्रकरणाचा तपास केरळ उच्च न्यायालयाने महिलेवर लावलेले आरोप गंभीर असल्याचं सांगितलं आणि केरळ पोलिसांच्या प्रमुखांना याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आणि त्यांच्या नेतृत्वात एसआयटीची टीम तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने सांगितलं की, जर मुलावर आपल्या आईवर इतके गंभीर आरोप करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली असेल तर त्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. जर एसआयटीला हवं असेल तर मुलाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याची रवानगी वडिलांपासून दूर बाल कल्याण समितीच्या संस्थेत करावी. हे ही वाचा-मध्यरात्री चेक करीत होता ईमेल; INBOX मध्ये जे पाहिलं त्यामुळे झोपूच शकला नाही कोर्ट म्हणालं... कोर्टाने सांगितलं की, या प्रकरणात आईचं ममत्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. आई 9 महिन्यांपर्यंत मुलाला आपल्या गर्भात वाढवते. त्यामुळे आई आणि मुलाचा संबंध त्याच्या जन्माच्या पूर्वीपासून असतो. केरळ उच्च न्यायालयाने पुढे सांगितलं की, आईचं आपल्या मुलाप्रती असलेलं निस्वार्थ प्रेम, ओढ, आपलेपणाची तुलना जगातील कोणासोबतही केली जाऊ शकत नाही. (mother herself sexually abused the child ) कोर्टाने आरोपी महिलेला जामीन देताना सांगितलं की, कोणतीही आई आपल्या मुलासोबत असं करू शकत नाही. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कडक्कावूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर आपल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचारा आरोप आहे. या प्रकरणात तिला 28 डिसेंबरदरम्यान अटक करण्यात आली. डिसेंबर 2019 मध्ये अल्पवयीन मुलाला दुबईतील शारजाहमध्ये त्याच्या वडिलांकडे पाठविण्यात आलं होतं. शारजाहमध्ये दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या आरोपी महिलेच्या पतीने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala

    पुढील बातम्या