VIDEO : छेड काढणं पडलं महागात, मुलींनी रोडरोमियोला भर रस्त्यात दिला चोप

VIDEO : छेड काढणं पडलं महागात, मुलींनी रोडरोमियोला भर रस्त्यात दिला चोप

छेड काढणाऱ्या तरुणाला मुलींनी आणि पालकांनी मिळून चांगलाच चोप दिला.

  • Share this:

औरंगाबाद, 29 फेब्रुवारी : औरंगाबादमधील वसुसायगांव येथे मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियाला चोप दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. शाळकरी मुली घरी जात असताना रस्तावर एका रोडरोमियोने मुलींची छेड काढली. त्यानंतर त्या तरुणाला मुलींनी आणि पालकांनी मिळून चांगलाच चोप दिला.

वसुसायगांव येथील तुळजाभवानी येथे दहावीत शिकणाऱ्या मुली शाळा सुटल्यानंतर 3 किमी अंतरावर असलेल्या खडकनाराळा येथे घरी जात होत्या. मात्र रस्त्यातच गावातील तरुणाने मुलींची छेड काढली. त्यावेळी आधी तर या मुली काहीशा घाबरल्या. मात्र नंतर त्यांनी धाडस करून सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

छेडछाडीची माहिती दिल्यानंतर पालक घटनास्थळी हजर झाले आणि सदरील तरुणाला चोप दिला. यावेळी तिथे गावातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. चोप दिल्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी आता पुढील कारवाई करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. शाळेसाठी दूरवर जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचेही प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत कठोर पावलं सरकारकडून उचण्यात यावेत, अशी मागणी समोर येत आहे.

First published: February 29, 2020, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading